नवी दिल्लीः फेमस शॉर्ट व्हिडिओ ला भारतात गुगल आणि अॅपल वरून हटवले आहे. गुगल आणि अॅपल ने हा निर्णय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातल्यानंतर घेतला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या अॅप्समुळे भारताची सुरक्षा आणि समाजाला धोका आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक शिवाय यूसी ब्राउजर, शेअरइट आणि कॅम्स स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. वाचाः हळू हळू होतायेत अॅप्स गायब सरकारने ज्या ५९ अॅप्सवर भारतात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अॅप्सना प्ले स्टोरवरून एक-एक करून हटवले जाऊ लागले आहे. टिकटॉक शिवाय प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हेलो सुद्धा स्टोरवर उपलब्ध नाही. ज्या फोन्समध्ये आधीपासून डाऊनलोडेड आहे. ते सध्या काम करीत आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, अॅप्सवर बंदी घालण्यासोबतच सरकारने गुगल आणि अॅपलला २४ तासांत यांना हटवण्याचे निर्देश दिले होते. वाचाः असे बंद होणार सध्याचे अॅप्स एका रिपोर्टनुसार, सरकार टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर्स ला निर्देश जारी करु शकते. फोनवर या अॅप्सला चालू करु देऊ नका. जर तुमच्या फोनमध्ये टिकटॉक आणि यूसी ब्राऊझर आधीच असतील तर लवकरच तुम्हाला एक मिळेल, ज्यात लिहिले असेल की, सरकारच्या आदेशानुसार, या अॅप्सचे अॅक्सेस रोखण्यात आले आहे. वाचाः टिकटॉकची बाजु आली समोर डेटा चोरी आणि याला शेअर करीत असल्याच्या आरोपावर टिकटॉक इंडियाने आपले म्हणने मांडले आहे. कंपनीने म्हटले की, अॅप भारतीय कायद्याच्या अंतर्गत राहून काम करते. चिनी सरकार सह कोणत्याही सरकारसोबत कुठल्याही प्रकारे समझौता करीत नाही. टिकटॉक इंडियाचे हेड निखिल गांधी यांनी म्हटले की, भारत सरकारच्या मंत्र्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडू, असे म्हटले आहे. कोणत्या अॅप्सवर घातली बंदी ज्या अॅप्सला ब्लॉक करण्यात आले आहे. त्यात टिकटॉक, Shareit, UC ब्राउजर, baidu मॅप, Helo, Likee, Mi कम्युनिटी, Club Factory, UC न्यूज, Bigo लाइव, Mi विडियो कॉल-शाओमी, Vigo विडियो, क्लीन मास्टर, कॅम स्कॅनर सह ५९ अॅप्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3imalnx