Full Width(True/False)

सॅमसंगच्या 108MP कॅमेरा फोनची किंमत आली समोर

नवी दिल्लीः Samsung कंपनी आपला १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला ला ऑगस्ट महिन्यात लाँच करणार आहे. आपली नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशीप डिव्हाईस लाँच करणार आहे. कंपनी ५ ऑगस्ट रोजी आपला अनबॉक्सिंग इव्हेंटमध्ये आपल्या लेटेस्ट प्रोडक्ट्सवरून पडदा हटवणार आहे. सॅमसंगची प्रसिद्ध सीरिज गॅलेक्सी नोट २० ची चाहत्यांना खूप उत्सूकता लागून राहिली आहे. या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Note 20 लाँच करण्यात येणार आहे. आता काही लिक्स मधून याच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे. वाचाः गॅलेक्सी नोट २० सीरिजची किंमत रिटेलरने आपल्या ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये गॅलेक्सी नोट २० च्या तीन व्हेरियंट्सच्या किंमतीची माहिती सांगितली आहे. यानुसार, गॅलेक्सी नोटची किंमत ९९२ डॉलर म्हणजेच ७४ हजार ५८६ रुपये आहे. नोट २० अल्ट्रा ची किंमत ११२१ डॉलर म्हणजेच ८४ हजार २८५ रुपये असणार आहे. रिटेलरच्या माहितीनुसार, नोट २० अल्ट्राचा ५जी व्हेरियंटची किंमत १३०० डॉलर म्हणजेच ९७ हजार ३४३ रुपयांपर्यंत असू शकते. वाचाः याआधीही लीक झाली होती किंमत याआधी नोट २० सीरिजची किंमत लीक झाली आहे. कोरियन पब्लिकेशन Naver च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, Galaxy Note 20 ला 1.2 मिलियन वॉन (जवळपास ७५ हजार रुपये) आणि Galaxy Note 20 Ultra ला 1.45 मिलियन वॉन (जवळपास ९० हजार रुपये) किंमतीवर लाँच करण्यात येवू शकते. वाचाः ५ ऑगस्ट रोजी सॅमसंगचा अनबॉक्सिंग इव्हेंट ५ ऑगस्टला सॅमसंगचा अनबॉक्सिंग इव्हेंट मध्ये गॅलेक्सी झेड फ्लिप आणि गॅलेक्सी फोल्ड २ लाँच केले जावू शकतात. याआधीही समोर आलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट २० सीरिजला बेस व्हेरियंट ९९९ डॉलर (जवळपास ७४ हजार ३०० रुपये) होऊ शकते. ही किंमत युनिव्हर्स कडून लीक करण्यात आली होती. गॅलेक्सी नोट २० सीरिजच्या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर किंवा Exynos 992 प्रोसेसर देण्यात येवू शकतो. तसेच कंपनी आपली लेटेस्ट वॉच सुद्धा या कार्यक्रमात लाँच करु शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38PWb9P