Full Width(True/False)

6000 mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह सॅमसंगचा फोन येतोय!

नवी दिल्लीः सॅमसंग कंपनी लवकरच एक नवीन जबरदस्त फोन घेवून येण्याची तयारी करीत आहे. हा नवीन स्मार्टफोन असू शकतो. सॅमसंगचा पुढील मिड रेंज स्मार्टफोन या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. हा फोन Galaxy M31 चा अपडेटेड स्मार्टफोन असणार आहे. नवीन फोनची किंमत २० हजार रुपये असू शकते. वाचाः फोनमध्ये आणि 64MP कॅमेरा राSamsung Galaxy M31s स्मार्टफोन सुपर एमोलेड Infinity O डिस्प्लेसोबत येवू शकतो. सध्या हा डिस्प्ले सॅमसंगचा फ्लॅगशीप रेंजच्या स्मार्टफोन्समध्ये येत आहे. सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये 6000 mAh बॅटरी दिली जावू शकते. तसेच फोनमध्ये 64MP कॅमेरा दिला जावू शकतो. फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. म्हणजेच फोनच्या बॅकला चार कॅमेरे दिले जाणार आहे. सॅमसंगने यंग युजर्संना डोळ्यापुढे ठेवून २०१९ च्या सुरुवातीला Galaxy M सीरीज लाँच केली होती. वाचाः Galaxy M सीरीज अंतर्गत ८ फोन लाँच गेल्या दीड महिन्यात कंपनीने आपल्या या प्रसिद्ध सीरीज अंतर्गत ८ फोन लाँच केले आहेत. सॅमसंगची पूर्ण गॅलेक्सी एम सीरिज, गॅलेक्सी M30s फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी या सीरीजने ऑनलाइन सेगमेंटमध्ये खूप चांगला परफॉर्म्स केला आहे. ज्यात सॅमसंगला ऑनलाइन सेगमेंटला आपली मजबूत स्थिती करण्यास मदत मिळाली. सॅमसंगने एम सीरीज अंतर्गत M11 आणि M01 स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने गेल्या तिमाहीत Galaxy M21 स्मार्टफोन इंडियन मार्केटमध्ये उतरवले होते. वाचाः अॅनालिस्ट्सच्या माहितीनुसार भारतात गॅलेक्सी एम स्मार्टफोन्सच्या यशानंतर सॅमसंग ऑनलाइन सेगमेंटमध्ये आपली बाजार भागीदारी वाढवण्यास मदत मिळाली आहे. तसेच सॅमसंगने ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या डिजिटल अनपॅक्ड इव्हेंटसाठी निमंत्रण पाठवणे सुरू केले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3et13Tm