नवी दिल्लीः सर्वात मोठी टेक कंपनी गुगल आणि भारतीय टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ एकत्र आल्याने इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील तसेच चायनीज ब्रँड्स सुट्टी सुद्धा करू शकते. दोन्ही कंपन्या एकत्र येवून भारतात स्वस्तात ४जी आणि ५जी स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारीत करीत आहे. एनालिस्ट्सच्या माहितीनुसार, या नवीन जोडीमुळे चायनीज ब्रँड्सला मोठे आव्हान मिळणार आहे. यांचे मार्केट शेअर ८० टक्क्यांहून अधिक आहे. वाचाः गुगल आणि जिओ पार्टनरशीमध्ये भारताचा नेटवर्कला 4G वरून 5G वर स्वीच करण्याचा प्रयत्न करतील. तसेच या नवीन जोडीमुळे स्मार्टफोन मार्केट वेगाने बदलू शकतो. याचे थेट परिणाम चायनीज स्मार्टफोन कंपन्यांना भोगावे लागतील. सध्या स्मार्टफोन मार्केटवर चायनीज स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, जिओ-गुगलच्या एकत्रितपणामुळे चायनीज कंपनीला शेयर गमावू लागू शकते. वाचाः मार्केट शेयर कमी होणार काउंटरपॉइंटच्या रिसर्च डायरेक्टर नील शाह यांनी सांगितले, भारतात ३ जी पासून ४ जी आल्याने इंडियन फोन ब्रँड्सचे शेयर वेगाने कमी होऊन केवळ १ टक्के राहिले आहे. या प्रमाणे जिओ आणि गुगलच्या पार्टनरशीपने ५ जी स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आल्यानंतर चायनीज कंपन्यांचा मार्केटमधील मोठा समभाग गमावण्याची पाळी चायनीज कंपनीला बसू शकतो. चायनीज कंपनी २०२१-२२ पर्यंत अफॉर्डेबल ५जी स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. वाचाः मोठ्या ब्रँड्सला आव्हान टेक्नोलॉजी रिसर्च फर्म सायबर मीडिया रिसर्च (CMR) च्या माहितीनुसार, गुगल आणि जिओ च्या एकत्रित आल्याने चायनीज आणि ग्लोबल ब्रँड्स साठी मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांना तयारीत राहावे लागेल. सीएमआरच्या इंडस्ट्री इंटेलिजेंस ग्रुपमध्ये रिसर्च अनालिस्ट अमित शर्मा यांनी सांगितले की, एंट्री लेवल स्मार्टपोन सेगमेंटमध्ये आता स्पेस आहे. आणि गुगल सोबत जिओची पार्टनरशीप त्या एन्ट्री लेवल मार्केट ला फुल ग्रोथकडे घेवून जाण्याची शक्यता आहे. सर्वात स्वस्त 5G फोन नुकत्याच झालेल्या पार्टनरशीप नंतर गुगलने आपल्या अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम आणि प्ले स्टोरला त्या स्मार्टफोन्ससाठी ऑप्टिमाईज करणार आहे. जे डिव्हाईसेज जिओ इंडियन मार्केटमध्ये लाँच करण्यात येणार आहेत. दोन्ही कंपन्या सोबत मिळून जगातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन घेवून येण्याची शक्यता आहे. अफोर्डेबल ५जी फोनची किंमत १० हजारांपासून २० हजारांपर्यंत असू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OsfHzw