मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी प्रत्येक बाजू तपासत आहे. आतापर्यंत ३० लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. असं असलं तरी सोशल मीडियावर सुशांतचे चाहते हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं याची मागणी करत आहेत. दरम्यान पोलिसांनी सुशांतच्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहेत. एएनआयच्या ट्वीटनुसार, ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतले आहेत. विशेष म्हणजे या तपासणीत पोलिसांना त्याच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा मिळाला नाही. डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं की पोलीस अजून फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी ३२ हून अधिक लोकांचा या प्रकरणी जबाब नोंदवला आहे. यात सुशांतच्या घरी काम करणारे कर्मचारी, मॅनेजर, एक्स- मॅनेजर, मित्र, गर्लफ्रेंड, को- स्टार, दिग्दर्शक आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा जबाब नोंदवण्यात आला. प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक यांची पोलिसांनी सोमवारी तीन तास चौकशी केली. या चौकशीचा तपशील सविस्तर मिळू शकला नसला, तरी भन्साळी यांनी सुशांतसिंह सोबत केलेल्या कराराबाबत पोलिसांनी प्रश्न विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या दोन चित्रपटांसाठी सुशांतला साइन केले होते. मात्र ऐनवेळी त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. म्हणून सुशांत नैराश्यामध्ये गेला, असे म्हटले जात आहे. यामध्ये सत्यता आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी भन्साळी यांना बोलविण्यात आले. सुशांत याने १४ जून रोजी वांद्रे येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी लिखित स्वरूपात काहीच न सापडल्याने त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूडमध्ये ठरवून काम दिले जात नसल्याच्या कारणामुळे तो तणावाखाली होता. 'सुशांतसिंहचा मृत्यू गळफासानेच!' सुशांतसिंहने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं. सुशांतचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. टीव्ही अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने मोठ्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सुशांतने 'किस देश में है मेरा दिल' मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'काय पो छे' हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नव्हतं. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरील बायोपिकने त्याचे बॉलिवूडमधील स्थान अधिक पक्कं केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z9fVSA