मुंबई- बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक सिनेमे प्रदर्शित होतात. काही हिट होतात तर काही सपशेल आपटतात. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते बिग स्टार्सना घेऊन सिनेमे करतात. या सिनेमांमध्ये कोट्यवधींचा पैसा ओतला जातो. पण सिनेमे चालतीलच असं नाही. कारण सिनेमाच्या निर्मितीत कितीही पैसा ओतला तरी तो चालणार की नाही याचा निर्णय पूर्णपणे प्रेक्षकांवर असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच बिग बजेट सिनेमांबद्दल सांगणार आहोत ज्या बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्या होत्या. ठग्ज ऑफ हिंदोस्तान- २०१८ मध्ये हा सिनेमा आलेला. यात , अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. २२० कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला होता. स्वतः आमिर खानने या सिनेमाचं अपयश स्वतःवर घेतलं होतं. साहो- ३५० कोटींचं या सिनेमाचं बजेट होतं. या सिनेमात सुपरस्टार प्रभाससोबत श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि नील नितीन मुकेश असे अनेक बॉलिवूड स्टार होते. भरपूर पैसा आणि उत्तम कलाकार असूनही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. झिरो- २०१८ मध्ये आलेला शाहरुख खानचा झिरो सिनेमाही बॉक्स ऑफिसवर असाच दणदणीत आपटला. या सिनेमात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा, कतरिना कैफ आणि आर. माधवन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. २०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरला होता. या सिनेमानंतर शाहरुखने मोठा ब्रेक घेतला. यानंतर त्याचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. रेस ३- २०१८ मध्ये आलेला रेस ३ हा सिनेमा याच यादीत येतो. , अनिल कपूर, बॉबी देओल आणि जॅकलीन फर्नांडिस यांची मुख्य भूमिका या सिनेमात होती. या सिनेमाचं एकूण बजेट १५० ते २०० कोटींपर्यंत होतं. पण हा एक फ्लॉप सिनेमा ठरला. ट्युबलाइट- सलमान खानचा २०१७ मध्ये आलेला ट्युबलाइट सिनेमाही फ्लॉप होता. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा सिनेमा एक आठवडाही सिनेमागृहात टिकला नव्हता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38AXd9o