Full Width(True/False)

सुशांतप्रमाणेच जपानी अभिनेत्याने केली आत्महत्या

मुंबई- Haruma Miura ने शनिवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३० वर्षांचा होता. त्याने आत्महत्या का केली हे अजूनपर्यंत कळू शकले नाही. सध्या सोशल मीडियावर त्याला अनेक कलाकारांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्याच्या एका चाहत्याने त्याचा फोटो शेअर करत म्हटलं की, 'सारं काही योग्य असतानाही त्याने हे पाऊल का उचललं कळत नाही.' विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर लोक सुशांत आणि जपानी अभिनेत्याच्या आत्महत्येत अनेक समानता पाहत आहेत. टीव्हीमधून सिनेमांमध्ये गेला होता Haruma Miura जपानी अभिनेता ची आत्महत्या ही सुशांतच्या आत्महत्याची आठवण करून देते. सर्वकाही सुरळीत असतानाही अभिनेत्याने आत्महत्या का केली असा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे. सुशांत आणि Haruma यांच्यात अजून एक साम्य असं की दोघांनीही टीव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याला एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचे होते. पण त्याआधीच त्याच्या आत्महत्येची बातमी कळाली. Haruma चे चाहतेही त्याच्या सतत हसऱ्या चेहऱ्याची आठवण काढत आहेत. अजूनपर्यंत कळलं नाही सुशांतच्या मृत्यूचं कारण १४ जूनला सुशांतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे अजून कळू शकलं नाही. शवविच्छेदनाच्या अहवालातही त्याचा मृत्यू गळफास लावल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या त्याच्या आत्महत्येची पोलीस चौकशी करत आहेत. हसत खेळत राहणारा सुशांत आत्महत्या करू शकतो यावर त्याच्या चाहत्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. मानसिक आजारांशी लढत होता सुशांत- दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण हे त्याचं डिप्रेशन असल्याचं सांगितलं जात असून याच्याच उपचारासाठी ते हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. सुशांतनं आत्महत्याच केली असून हत्येचा कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या का केली याचंही उत्तर आम्हाला जवळजवळ मिळालं आहे, असंही ते म्हणाले. डिप्रेशनच्या दोन भयावह आजारांनी सुशांतला ग्रासलं होतं. या दोन मानसिक आजारांनीच त्याचा जीव घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पॅरानोया आणि बायपोलक डिसऑर्डर या दोन आजारांनी सुशांत ग्रासला होता. या आजारांवर हिंदुजा रुग्लालयात त्यानं आठवडाभर उपचार घेतले होते. 'पॅरानोया' हा एक संशयाचा आजार आहे. यात आपल्या जवळच्या व्यक्ती आपला द्वेश करतायत असं वाटू लागतं. एकांतात असताना कोण तरी आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करतंय, असा विचार सतत डोक्यात येत असतो. तसंच बायपोलक आजारात व्यक्तीच्या स्वभावात सतत चढउतार पाहायला मिळतात. कधी तो एकदम तणावात असतो तर कधीतरी व्यक्तीचा आत्मविश्वास अचानक वाढतो. त्यामुळं हे दोन आजार त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2CoGR8c