नवी दिल्लीः ओप्पोकडून नवीन बजेट डिव्हाईस लाँच करण्यात आला आहे. या फोनला कंपनी 90Hz पंच होल डिस्प्ले, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टची 5000mAh बॅटरी आणि AI ट्रिपल कॅमेऱ्यासोबत आणले आहे. ओप्पोच्या या फोनची किंमत १२ हजार ९९० रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर क्रेजी डीलमध्ये हा फोन तुम्ही केवळ ३५९७ रुपयांच्या इफेक्टिव किंमतीत खरेदी करू शकाल. या फोनचा सेल फ्लिपकार्टवर २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. सध्या साईटवर बिग दिवाळी सेल सुरू झाला आहे. वाचाः अशी मिळणार ऑफर शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर २९ ऑक्टोबर पासून बिग दिवाली ऑफर सुरू होणार आहे. हा सेल ४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान Oppo A33 ला १२ हजार ९९० रुपयांत ओरिजनला किंमती ऐवजी ११ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. यासोबत फ्लिपकार्टवर एक क्रेजी डेली ऑफर करीत आहे. ग्राहकांना हा फोन बायबॅक गॅरंटी सोबत ३५९७ रुपयांच्या इफेक्टिव किंमतीत खरेदी करू शकतो. यासाठी तुम्हाला चेकआउट करताना सोबत हा फोन खरेदीसाठी ऑप्शन निवडावा लागेल. वाचाः बायबॅक गॅरंटी म्हणजेच फोनची बाकीची किंमत ६ ते ८ महिन्या दरम्यान दुसरा फोन खरेदी करण्यावर तुम्हाला डिस्काउंट म्हणून मिळणार आहे. यासाठी तुम्हाला ६ ते ८ महिन्यात एक्सचेंज करावा लागेल. म्हणजेच ८ महिन्यांपर्यंत केवळ ३५९७ रुपयांत Oppo A33 मिळू शकतो. पुढील डिव्हाईस खरेदी करताना या फोनच्या बदल्यात तुम्हाला ११ हजार ९९० रुपयांची बाकीची रक्कम एक्सचेंज डिस्काउंट म्हणून मिळणार आहे. वाचाः Oppo A33 चे खास वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस होल पंच डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर बेस्ड ColorOS 7.2 मिळतो. याच्या रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर पॅनलवर १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळतो. तसेच मॉड्यूलमध्ये २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स मिळतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HxqJni