Full Width(True/False)

...म्हणून प्रिती झिंटाने करुन घेतली तब्बल वीस वेळा करोना चाचणी

मुंबई: अभिनेत्री सध्या दुबईत आहे. तिथे राहून ती तिच्या या टीमला पाठिंबा देत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएलचा हंगाम दुबईमध्ये प्रेक्षकांशिवायच पार पडतो आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आयपीएलशी जोडले गेलेले सर्वच लोक अनेक गोष्टींची काळजी घेत आहेत. प्रीतीसुद्धा सर्व प्रकारे काळजी घेत असून, ती वेळोवेळी स्वत:ची करोना चाचणी करून घेत आहे. प्रीतीनं आतापर्यंत तब्बल वीस वेळा करोना चाचणी करून घेतली आहे आणि त्या सर्व चाचण्यांचे अहवाल सुदैवानं नकारात्मक आलेले आहेत. तिने नुकतीच विसावी करोना चाचणी केली आहे. प्रीतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिनं करोना चाचण्यांबद्दल माहिती दिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jrCjgY