नवी दिल्लीः जर तुम्हाला रेडमीचा कोणताही स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही जबरदस्त संधी आहे. कंपनी या फेस्टिव सीजनमध्ये Redmi Note 9 Pro, Redmi Note 9 Pro Max आणि Redmi Note 9 वर ४ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या दरम्यान, रेडमी या तीन स्मार्टफोनवर कंपनीच्या वेबसाइटवरून एचडीएफसी बँक कार्डवरून खरेदी केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे. वाचाः १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करा रेडमी नोट ९ प्रो mi.com वर स्मार्टफोन बोनांजा सेल मध्ये या फोनला १६ हजार ९९९ रुपयांऐवजी १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर च्या या फोनमध्ये 5,020mAh बॅटरी दिली आहे. वाचाः रेडमी नोट ९ प्रो मॅक्सची किंमत झाली १५ हजार ९९९ रुपये या फोनला ३ हजार रुपयांच्या सूटनंतर १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. डिस्काउंटआधी या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये होती. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशनसोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः ११ हजार ४९९ रुपयांत झाला रेडमी नोट ९ बोनांजा सेलमध्ये या फओनची किंमत १४ हजार ९९९ रुपयांऐवजी ११ हजार ४९९ रुपये झाली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळत. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e3KK0H