मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री हिनं नुकतीच चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. सईनं तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत. गेल्या काही दिवसांपासून सई चर्चेत आहे. तिनं तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबत फोटो शेअर केले होते, मात्र, त्याची ओळख लपवली होती. अखेर आता सईचा लाइफ पार्टनर कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर तिच्या चाहत्यांना मिळालं आहे. असं सईच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे. लवकरच दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. तिर्थदीप सिनेनिर्माता असल्याची माहिती आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात असताना सईच्या लव्ह लाइफबद्दल तिनं खुलासे केले होते. तसंच आणि यांच्यात 'कुछ तो गडबड है' अशी चर्चाही रंगली होती. झाली आहे. 'बिग बॉस'च्या घरात दोघांचं चांगलं जमत होतं. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वावरताना दिसलेली. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं, सईच्या मनोरंजनासाठी पुष्करनं आयटम नंबरवर डान्स करणं किंवा जेवणावेळी पुष्करच्या ताटात सईनं जेवण करणं. त्यावर घरातल्या इतर सदस्यांनी 'प्यार बाटने से बढता है' म्हणत दोघांची टर उडवणं. या प्रसंगांतून दोघांमधील मैत्रीचं नातं आता नवीन वळण घेतं की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3joTf8v