Full Width(True/False)

हत्या की आत्महत्या? एम्सच्या डॉक्टरांचा यू टर्न; 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई: प्रकरणात सीबीआयनं एम्सच्या डॉक्टरांची समिती स्थापन केली होती. या समितीनं मुंबईतील कूपर हॉस्पिटलनं दिलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट तपासला. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी सोमवारी अंतिम अहवाल सीबीआयला सादर केला. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. सुशांतचा खून झाल्याचं यातून निष्पन्न होत नसल्याचं एम्सच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यानंतर एम्सच्या डॉक्टरांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यानंतर सुशांत्या बहिणीकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या समितीचे हेड डॉक्टर यांनी सुशांतचा गळा दाबून हत्या झाल्याचा दावा धुडकावून लावलाय. परंतु आता डॉ. सुधीर गुप्ता यांची एक ऑडिओ क्लिप लीक झाली असून सुशांतनं आत्महत्या नाही तर त्याची हत्या झाली आहे, असा दावा गुप्ता या ऑडिओ क्लिपमध्ये करत असताना दिसतायत. या व्हायरल झालेल्या क्लिप वर सुशांतची बहीण हिनं संताप व्यक्त केलाय. डॉक्टरांनी अशा प्रकारे यू टर्न का घेतला, याचं उत्तर मिळायलाच हवं, असंं तिनं म्हटलं आहे. शरीरात कोणतेही विषारी किंवा मादक पदार्थ आढळले नाही एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमनं त्यांच्या तपासाबाबत टीमशी दीर्घकाळ चर्चा केली. डॉ. गुप्ता पुढे म्हणाले की, 'बॉम्बे टॉक्सिक सायन्स लॅब तसेच टॉक्सिकोलोजी लॅबमध्ये सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळले नाही. गळ्यावर असलेलाडाग हा गळफासामुळंच होता. यापूर्वी सुशांतचं शवविच्छेदन करणार्‍या कूपर रुग्णालयाच्या पॅनेलने सुशांतचा मृत्यू आत्महत्यनंच झाल्याचं म्हटलं होतं. असं असलं तरी मेडिकल बोर्डानं याहून जास्त माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. हत्येच्या अँगलमधून केला जात होता तपास सुशांतचे कुटुंबिय, मित्र आणि चाहते सीबीआयच्या चौकशीत उशीर झाल्याबद्दल निराशा व्यक्त करत आहेत. तसंच या घटनेची चौकशी आत्महत्येच्या अँगलने नाही तर खुनाच्या दृष्टीने करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करत होते. सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलांनीही या प्रकरणाच्या चौकशीत होत असलेला उशीर पाहून नाराजी व्यक्त केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lcIuGP