मुंबईः दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळं चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री हिनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पायलनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा हाती घेतला. गेल्या दोन तीन महिन्यांपासून पायल घोष चर्चेत आहे. तिनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण आणि गैरवर्तवणूकीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी पायलला न्याय मिळावा यासाठी रामदास आठवले यांनी राज्यपाल कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. आता पायलनं रिपाइंत प्रवेश करून राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पायल घोषला रिपाईच्या महिला मोर्चाचं उपाध्यक्ष बनवलं जाऊ शकतं,अशा चर्चाही सध्या सुरू आहेत. काय म्हणाले आठवले?पायलच्या पक्ष प्रवेशावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पायलवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच पाहिजेच. यासाठी आम्ही तिच्या सोबत आहोत. पायल या पश्चिम बंगालच्या आहेत. त्या मुंबईत राहतात. त्यामुळं त्यांना मदत करणं आणि पाठिंबा देणं आमची जबाबदारीच होती, असं आठवले म्हणाले. तसंच या प्रकरणी अनुराग कश्यप याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पायलच्या पक्ष प्रवेशादरम्यान केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3orx84e