नवी दिल्लीः रेडमीचा प्रसिद्ध बजेट स्मार्टफोन ३ हजार रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. सूटनंतर या जबरदस्त स्मार्टफोनला तुम्ही mi.com वरून खरेदी करू शकता. फेस्टिव सीजनमध्ये फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये ऐवजी ९ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपये झाली आहे. शाओमीच्या वेबसाईटवर एचडीएफसी बँक कार्ड वरून या फोनला ऑर्डर केल्यास १ हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः रेडमी ९ प्राईमचे वैशिष्ट्ये फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास २ प्रोटेक्शन सोबत येतो. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 SoC प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइट अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh बॅटरी दिली आहे. फोनला १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या फोनमध्ये कनेक्टिविटीचे सर्व स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35Gztj0