Full Width(True/False)

अभिनेता बायसेक्शुअल असल्याचं कळताच आई- भावाने तोडले संबंध

मुंबई- ' ११' मध्ये विकास गुप्ताला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. सुशांतसिंह राजपूतच्या मित्रांपैकी एक आहे. सुशांत प्रकरणावरही त्याने आपलं मत अनेकदा मांडलं आहे. अलीकडेच ३ नोव्हेंबर रोजी त्याचा भाऊ सिद्धार्थच्या वाढदिवसाची पार्टी झाली तेव्हा विकास चर्चेत आला. कारण या पार्टीत विकासाला बोलावण्यात आलं नाही. पार्टीमध्ये त्याची आई आणि भाऊ वतनसोबत इतर बरेच खास मित्र उपस्थित होते. विकासला यामागचं कारण विचारलं असता त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. विकासने सांगितलं की जेव्हा त्याने कुटुंबाला त्याच्या बायसेक्शुअल असण्याबद्दल सांगितलं त्यानंतर त्याची आई आणि भाऊ त्याला सोडून गेले. वडिलांनीही केलं दूर गेल्या काही वर्षांपासून विकास आणि त्याचा भाऊ सिद्धार्थ यांच्यात फारसे चांगले संंबंध नाहीत हे याआदीच स्पष्ट झालं होतं. विकासने सांगितलं की तो उभयलिंगी असल्यामुळे त्याची अनेक नाती तुटली. विकासच्या वडिलांनी याआधीच त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते. आता घरातल्या इतरांना कळल्यानंतर इतर नातेवाईकांनीही त्याच्याशी बोलणं आणि भेटणं जवळपास बंद केलं. 'माझ्यासोबत राहिल्यामुळे कुटुंबाला लाज वाटते' विकास म्हणाला की, 'जेव्हापासून मी उभयलिंगी असल्याचं माझा भाऊ सिड आणि आईला कळलं. दोघांनीही माझं घर सोडलं. यानंतर गोष्टी अधिक वाईटालाच गेल्या. कुटुंबाला या गोष्टीची लाज वाटते त्यामुळेच त्यांना माझ्यासोबत रहायचंही नाही. आता त्यांना मला पाहायचीही इच्छा नाही.' 'मला उत्सवांचे वातावरण खराब करायचे नाही' विकास पुढे म्हणतो, 'मला सुरुवातीला बहिणींनी पाठिंबा दर्शवला होता. पण आपला समाज थोडा अवघड आहे. म्हणून मला वाढदिवसाच्या पार्टीला न बोलवणं हे एका प्रकारे योग्यच आहे. कारण मला त्यांचा आनंद खराब करायचा नाही.' असं असलं तरी 'ई-टाइम्स' ने सिद्धार्थशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने काहीही बोलण्यास नकार दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2GORVh2