मुंबई- प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिचे सोमवारी सकाळी निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, दिव्या गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर जीवनाची लढाई लढत होती. मात्र सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती ३४ वर्षांची होती. दिव्याला करोना विषाणूची लागण झाली होती. तिला गोरेगावच्या एसआरव्ही इस्पितळात दाखल करण्यात आलं. दिव्या भटनागरच्या निधनाने अभिनेत्री हिला मोठा धक्का बसला आहे. देवोलीनाने सोशल मीडियावर दिव्याच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये देवोलीना दिव्याच्या नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दिव्याच्या निधनाचा मोठा आघात देवोलीनावर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. यात ती दिव्याच्या आठवणींना उजाळा देत आहे. इतकंच नाही तर देवोलीनाने दिव्याचा पती गगन गबरूविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गगनने दिव्याच्या आईवरही अनेक गंभीर आरोप केले होते. व्हिडिओमध्ये तिने दिव्याला नात्यात कसं फसवलं गेलं आणि शेवटी ती कशी एकटी पडली हेही सांगितलं. यासोबतच गगनच्या इतर वाईट वागणुकींचाही खुलासा तिने यावेळी केला. तसेच याची कोणतीही कुवत नसताना दिव्याने त्याला मदतीचा हात दिला, मुंबईत काम दिलं, पण त्याबदल्यात गगनने दिव्याला फक्त मानसिक त्रास दिला. तिचे दागिनेही घेऊन गेला. ती एवढी मानसिक तणावात होती की तिला मधुमेहाचा आजार सुरू झाला. गगनने त्याच्या व्हिडिओमध्ये दिव्याच्या आईविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. यावर देवोलीनाने त्याची बरीच शाळा घेतली. व्हिडिओमध्ये देवोलिनाने गगनवर दिव्याला मारहाण केल्याची आणि तिला मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले आहेत. एवढंच नाही तर शिमला येथे शोषणाच्या आरोपाखाली गगन सहा महिने तुरुंगात राहून बेलवर बाहेर आला आहे. तो केव्हाही तुरुंगात पुन्हा जाऊ शकतो. दिव्यामुळे तो मुंबईत परत आला. आता देवोलीनाने गगनचे सगळे व्यवहार बाहेर काढण्याचा पणच घेतला आहे. शिवाय तो आणि त्याची आई पुढील आयुष्य तुरुंगातच सडून काढतील असंही तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m03Nex