मुंबई: सुप्रसिद्ध कादंबरीकार, लेखक यांच्या लेखणीतून उतरलेल्या '' या कादंबरीवर आधारित एक मराठी सिनेमा लवकरच तयार होणार आहे. या सिनेमासाठी अभिनेता-दिग्दर्शक आणि लेखक-अभिनेता हे दोघे काम करणार आहेत. 'हिरकणी'ची ही प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक जोडी 'चंद्रमुखी'साठीही एकत्र येतेय. प्रसाद ओकनं त्याच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. त्याचं पोस्टर पाहून यात कोण अभिनेत्री झळकणार अशी चर्चा सुरू झाली होती. विविध अभिनेत्रींची नावं समोर आली. प्रसादची चंद्रमुखी दुसरी-तिसरी कुणी नसून अभिनेत्री असणार आहे. तमाशा आणि राजकारणावर आधारित या प्रसिद्ध कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्र आहे सौंदर्यवती 'चंद्रमुखी'. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक सांभाळणार आहे. तर कादंबरीत जे मांडलंय ते पडद्यावर तितक्याच ताकदीनं पडद्यावर मांडण्यासाठी लेखनाची धुरा चिन्मय मांडलेकरच्या खांद्यावर आहे. सिनेमाची पटकथा-संवाद तो लिहितो आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mnPMYC
