नवी दिल्लीः Amazon सेलला सुरुवात झाली आहे. लॅपटॉप आणि टेबलेट्सवर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तर मोठ्या अप्लायन्सेज आणि टीव्हीवर तसेच हेडफोनवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. वाव सॅलरी डेज सेलला १ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. हा सेल ३ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. अॅमेझॉनने या सेलसाठी बँक ऑफ बडोदा सोबत पार्टनरशीप केली आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडि कार्ड व क्रेडिट कार्ड ईएमआय द्वारे खरेदी केल्यास १५०० रुपयांची सूट मिळणार आहे. वाचाः लॅपटॉप वर या सेलमध्ये ६ महिन्यांपर्यंत ईएमआय ऑफर केली जात आहे. एचपी, डेल आणि मायक्रोसॉफ्टचे लॅपटॉप ३० टक्क्यांपर्यंत सूट सोबत लिस्टेड करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट सर्फेस लॅपटॉप ३ १३.५ इंचाचा मॉडलला ९८ ९९९ रुपयांऐवजी ९० हजार ९९० रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. वाचाः याशिवाय, अॅमेझॉनने जाब्रा, बोट, सोनी, जेबीएल आणि अन्य दुसऱ्या ब्रँडच्या हेडफोन्सवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. तसेच बोट जेबीएल आणी मी साउंडबार वर ३० टक्क्यांपर्यंत किंमत कपात करण्यात आले आहे. अॅमेझॉन प्रीमियम हेडफोन्स आणि स्पीकर्स वर नो कॉस्ट ईएमआय देत आहे. अॅपल एयरपॉड्स प्रो ला ४ हजार रुपयांच्या सूटसोबत २० हजार ९९० रुपयात उपलब्ध करण्यात आले आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्लसला ८ हजार ९९० रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. वाचाः अॅमेझॉन वाव सॅलरी डेज सेलमध्ये रेफ्रिजरेटर ला ६ हजार ४९० रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. तर वॉशिंग मशीनवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. अँड्रॉयड टीव्हीला ३० टक्क्यांसोबत खरेदी करण्याची संधी आहे. ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही २५ टक्के सूट सोबत खरेदी करता येवू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ltTdMP