Full Width(True/False)

मुलीचा बाप झालो... लेकीचा फोटो पोस्ट करत अंकुर वाढवेनं शेअर केली गोड बातमी

मुंबई: '' या विनोदी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटो आहे त्याच्या घरी आलेल्या एका खास व्यक्तीचा. अंकुरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं असून सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यानं ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 'कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो', असं म्हणत अंकुरनं त्याच्या आयुष्यातील हा खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अंकुरनं ही गोड बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तसंच इतक कलाकार मंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंकुरनं शेअर केलेल्या फोटोत त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदं स्पष्टपणे दिसून येतोय. 'चला हवा येऊ द्या' मुळं अंकुर घराघरांत पोहोचला. चांगला अभिनेता तर आहेच परंतू तो एक चांगला कवी देखील आहे. ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. अंकुशनं सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केलं. त्या संधीचं अंकुरनं सोनं केलं. पुढं त्याने गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्यानं काम केलं होतं. यानंतर त्याला ‘चला हवा येऊ द्या’मध्येही काम करण्याची संधी मिळाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nYtT2U