Full Width(True/False)

फोटो काढले म्हणून भडकल्या जया बच्चन, फोटोग्राफर्सने मागीतली माफी

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री या फारच कडक शिस्त असलेल्या महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांना सहसा छायाचित्रकारांना फोटो काढायला देणं आवडत नाहीत. त्या बऱ्याचदा फोटोग्राफर आणि चाहत्यांवर रागावताना दिसतात. नेमकी याचमुळे त्या अनेकदा चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा जया यांनी फोटोग्राफर्सना फोटो काढले म्हणून फटकारलं आहे. विशेष म्हणून छायाचित्रकारांनी यावेळी त्यांची माफीही मागितली. नुकत्याच जया दाताच्या दवाखान्यात जाताना दिसल्या. त्या गाडीतून खाली उतरताच छायाचित्रकारांनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. पण अशाप्रकारे जया यांचे फोटो काढणं त्यांना महागात पडेल याची त्यांना कोणतीच कल्पना नव्हती. जया बच्चन यांना त्यांचे फोटो काढल्याबद्दल राग आला. यानंतर लगेच गाडीतून चालक बाहेर आला आणि त्याने फोटो न घेण्याबद्दल सांगितलं. पण तोपर्यंत जया यांचा रागाचा पारा चढला होता. 'तुम्ही इथे पण येता का?' असा रागात प्रश्न त्यांनी विचारला. यावर उत्तर देताना छायाचित्रकार म्हणाले की, 'तुमची गाडी पाहून आम्ही इथे आलो.' यानंतर छायाचित्रकारांनी जया बच्चन यांची माफी मागितली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38JrLHE