Full Width(True/False)

शाओमीचा Mi 10i 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः शाओमी आज भारतात आपला स्मार्टफोनला लाँच करणार आहे. हा फोन कंपनीचा Mi 10 सीरीजचा लेटेस्ट फोन असणार आहे. यासोबतच २०२१ मध्ये भारतात चीनी कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. आतापर्यंत आलेल्या टीजर्सवरून उघड झाले आहे की, फोनला अपर मिड रेंज वैशिष्ट्येसह जसे स्नॅपड्रॅगन ७५० चिपसेट आणि ब्रँड न्यू १०८ मेगापिक्सलचा सेन्सर सोबत लाँच केले जाणार आहे. वाचाः Mi 10i 5G च्या टीजर्सवरून फोनच्या रियरवर एक सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल असल्याचे दिसत आहे. फोनला अटलांटिक ब्लू आणि पॅसिफिक सनराइज कलर व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात येणार आहे. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी ही माहिती दिली आहे की, Mi 10i 5G मधील आय चा अर्थ इंडिया असा आहे. फोनची लाँचिंग आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. वाचाः Mi 10i 5G फोनची संभावित वैशिष्ट्ये शाओमीच्या Mi 10i 5G नुकतेच बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर मॉडल नंबर M2007J17I सोबत पाहिले गेले आहे. लिस्टिंगमधून ही माहिती उघड झाली आहे की, फोन मध्ये ८ जीब रॅम व ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी चिपसेट असणार आहे. फोनने सिंगल कोरमध्ये ६५२ आणि मल्टी कोरमध्ये २००४ स्कोर दिला आहे. हँडसेटच्या अँड्र्रॉयड ११ बेस्ड MIUI 12.5 स्किन सोबत येण्याची शक्यता आहे. वाचाः मी10i 5G स्मार्टफोन कंपनी चा Mi 10 Lite ग्लोबल वर्ज़न चा रीब्रँडेड वेरियंट असू शकतो. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले सोबत १२० हर्ट्ज रिफ्रेश रेज, १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 4820mAh बॅटरी दिली जावू शकते. या फोनची किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LopiJn