नवी दिल्लीः () ने पुन्हा एकदा कॉल क्वॉलिटीत जिओ आणि एअरटेलला मागे टाकले आहे. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया () ने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२० मध्ये वोडाफोन आयडियाची कॉल क्वॉलिटी अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जबरदस्त होती. Vodafone Idea (Vi) ने कॉल क्वॉलिटी मध्ये नोव्हेंबर महिन्यात सुद्धा रिलायन्स जिओ आणि एअरटेलला मागे टाकले होते. वाचाः ट्रायच्या माहितीनुसार केवळ आयडिया नेटवर्कला व्हाइस क्वॉलिटीत डिसेंबर महिन्यात ५ पैकी ४.९ गुण मिळाले आहेत. या यादीत दुसऱ्या नंबरवर वोडाफोन आहे. ज्याला ५ पैकी ४.३ गुण मिळाले आहेत. आता वोडाफोन आयडिया भारतात मिळू एकत्र Vi ब्रँड म्हणून काम करीत आहेत. ट्रायचा हा रिपोर्ट जाहीर झाल्याने आयडियासाठी चांगली गुड न्यूज आहे. वाचाः TRAI ची वेबसाइट वर डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी सर्व माहिती मिळू शकते. कॉल क्वॉलिटी मध्ये वोडाफोन आयडिया टॉप आहे. परंतु, दुसऱ्या नंबरवर बीएसएनएल आणि जिओ हे दोन्ही संयुक्त आहे. या दोन्ही कंपन्यांना ३.९ सरासरी रेटिंग मिळाली आहे. या यादीत सर्वात खालच्या स्थानी एअरटेल आहे. एअरटेलला ५ पैकी केवळ ३.१ गुण मिळाले आहेत. TRAI चा डेटा जास्त करून युजर्सच्या फीडबॅकच्या आधारावर तयार केला जात आहे. इनडोर कॉल क्वॉलिटी धरल्यास वोडाफोनला ४.४ रेटिंग मिळाली आहे. तर आउटडोर मध्ये या कंपनीला ३.८ रेटिंग मिळाली आहे. वाचाः इनडोर आणि आउटडोर कॉल क्वॉलिटी दोन्हीचे कंपनीचे सरासरी ४.९ गुण होतात. बीएसएनएलला इनडोर कॉलिंगमध्ये ३.८ रेटिंग मिळाली आहे. तर आउटडोर मध्ये या कंपनीला ४.३ ची रेटिंग मिळाली आहे. या प्रमाणे रिलायन्स जिओला इनडोर कॉल क्वॉलिटीत ३.९ रेटिंग मिळाली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35h9cs9