मुंबई: बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यांच्या निधनाला आज ३ वर्ष पूर्ण झाली आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. श्रीदेवींच्या अशा अचानक एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. आपल्या चित्रपट कारकिर्दित श्रीदेवीनं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं आणि त्यातले बरेच चित्रपट सुपरहिट झाले. पण एक वेळ अशी सुद्धा होती. जेव्हा श्रीदेवी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. तेव्हा त्यांची मनधारणी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी ट्रक भरून गुलाबाची फुलं श्रीदेवींच्या चित्रपटाच्या सेटवर पाठवली होती. १९८९ मध्ये यश चोप्रा यांच्या 'चांदनी' चित्रपटानंतर सगळीकडेच श्रीदेवी यांच्या नावाची चर्चा होती. हा पहिला बिग बजेट स्त्रीप्रधान चित्रपट होता. ज्यात श्रीदेवी यांच्यासोबत सहकलाकार म्हणून ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांनी काम केलं होतं. या चित्रपटानंतर श्रीदेवी यांना लेडी अभिताभ बच्चन असं म्हटलं जाऊ लागलं होतं. पण जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटासाठी जेव्हा श्रीदेवी यांना विचारणा झाली त्यावेळी त्यांनी या चित्रपटासाठी नकार दिला. अमिताभ बच्चन यांच्याकडे दिग्दर्शक मुकुल आनंद '' या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आले होते. अमिताभ यांनी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर लेगचच श्रीदेवी यांचं नाव मुख्य भूमिकेसाठी सुचवलं. पण त्यांना हे सुद्धा माहीत होतं की श्रीदेवी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी तयार होणार नाहीत. म्हणून अमिताभ बच्चन यांनी एक युक्ती शोधली. त्यांनी श्रीदेवी यांच्या चित्रपटाच्या सोटवर एक ट्रक भरून गुलाबाची फुलं पाठवून दिली. श्रीदेवी त्यावेळी सरोज खान यांच्यासोबत एका गाण्याचं शूटिंग करत होत्या. अमिताभ यांनी सेटवर गुलाब फुलांनी भरलेला ट्रक पाठवला. श्रीदेवी यांना ट्रकच्या जवळ बोलवण्यात आलं आणि तिच्यावर या फुलांचा वर्षाव करण्यात आला. अमिताभ यांचा हा अंदाज श्रीदेवी यांना खूप आवडला आणि त्यांनी 'खुदा गवाह'साठी अमिताभ यांच्यासोबत काम करण्यास होकार दिला. पण यासोबत त्यांनी एक अटही घातली होती. श्रीदेवी यांनी अमिताभ यांना अट घातली होती की, त्या या चित्रपटात डबल रोल साकारतील. या चित्रपटात श्रीदेवी यांना आई आणि मुलगी या दोन्ही व्यक्तीरेखा साकारायच्या होत्या. अमिताभ यांचा हा पहिला चित्रपट होता ज्यात एक अभिनेत्री डबल रोल करणार करण्याचा विचार करत होती. श्रीदेवी यांची ही अट मान्य केली गेली आणि हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान चालला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kqN70U