Full Width(True/False)

दीपिकाचा दिनक्रम असतो तरी कसा? पाहा व्हिडिओ

मुंबई: अभिनेत्री सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत बिझी आहे. पण त्यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. पण स्वतःच्या बिझी शेड्युलमधून या सर्व गोष्टींसाठी दीपिकाला कसा वेळ मिळतो. कसा असतो तिचा दिनक्रम याविशयी सर्वांनाच उत्सुकता असेल. तर आता दीपिकानं स्वतःच एक व्हिडीओ शेअर करत तिच्या रोजच्या दिनक्रमाची एक झलक दाखवली आहे. दीपिका पदुकोणनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'माझं रोजचं रूटीन... शेवटपर्यंत पाहा.' सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत संपूर्ण दिवसभरात तिचं रूटीन कसं असतं हे या व्हिडीओमध्ये दीपिकानं सांगितलं आहे. दीपिका सांगते, माझा दिनक्रम कसा असतो हे सांगणं खरंच कठीण आहे. कारण माझा रोजचा दिवस सारखा नसतो. पण मी सकाळी उठून ब्रश करते आणि मग ब्रेकफास्ट. पण माझी सकाळ शांत असलेली मला जास्त आवडते. या व्हिडीओमध्ये दीपिकाला तिच्या प्लान बद्दल विचारण्यात आलं आहे. ज्याचं उत्तर देताना ती सांगते, हो आणि नाही सुद्धा. मला वाटतं हा माझ्या जीवनशैलीचा एक भाग आहे. कारण मला प्रत्येक गोष्ट प्लानिंग करून पूर्ण करणं जास्त आवडतं. पण काही वेळा मी सर्व काही सोडून देते आणि जे जसं चाललंय तसं चालू देते. माझं सर्व प्लानिंग हे अशाप्रकारे असतं. हे सर्व माझ्या रोजच्या दिनक्रमाचा भाग आहे. दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच रणवीर सिंगसोबत '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तिच्या आगामी चित्रपटांमध्ये शाहरुख खानचा 'पठाण' आणि अभिनेता हृतिक रोशनसोबत 'फायटर' यांचा समावेश आहे. याशिवाय ती महाभारतावर आधारित एका ऐतिहासिक चित्रपटात द्रौपदीच्या भूमिकेतही दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dZUYkC