Full Width(True/False)

...म्हणून कलाकारांना तातडीनं करोना लस द्याच; सोनी राझदान यांची मागणी

मुंबई:करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण सुरू झालं असलं तरी, अनेक कलाकारांना करोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. काही बेजबाबदार कलाकारांकडून आखून दिलेल्या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याने करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. याच संदर्भात अभिनेत्री यांनी ट्विट करत कलाकरांना प्रतिबंधात्मक तातडीनं देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सोनी राजदान यांनी ट्विट करत कलाकारांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मागणी केली आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. 'सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना सरकारनं लवकरात लवकर करोना प्रतिबंधात्मक लस द्यायला हवी, कलाकारांना मास्क घालून काम करणं शक्य नाही. आमच्या क्षेत्रात काम करताना कलाकार स्वत:ची काळजी घेऊ शकत नाहीत, इतर क्षेत्रात मास्क घालून काम होऊ शकत, ते स्वत:ची काळजी घेऊ शकतात', असं सोना राझदान यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच कलाकारांना देण्यावर ज्यांचा आक्षेप आहे त्यांना सोनी राझदान यांनी सुनावलं आहे. ' हा देखील एक रोजगार आहे. पोटासाठी लोकं काम करताय. इतर लोकं काळजी घेत काम करू शकतात. पण केवळ अभिनय करणारे कलाकार आहेत जे मास्क घालून काम करू शकत नाहीएत. प्रत्येक कलाकार सुपरस्टार नसतो.आणि जे आज याबद्दल तक्रारी करतायत त्यांनी तोंड बंद ठेवावं आणि कलाकारांचा कंन्टेंट बघणं बंद का करत नाहीत. कलाकारांच्या आयुष्य पणाला लावून ते शूटिंग करत असतात', असंही सोनी यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Qh0JAF