Full Width(True/False)

११९ रुपयांत खरेदी करा ८१९ रुपयांचा गॅस सिलिंडर, जाणून घ्या मस्त ऑफर

नवी दिल्लीः पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सोबत गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुद्धा भरमसाठ वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत ७६९ रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर ८१९ रुपयांना झाले आहे. म्हणजेच गॅस सिलिंडर मध्ये ५० रुपयांची वाढ झाली आहे. अशात Paytm ची एक जबरदस्त ऑफर आहे. Paytmच्या या जबरदस्त ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही ८१९ रुपयांचा गॅस सिलिंडर अवघ्या ११९ रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. ही ऑफर ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध आहे. Paytm वरून सिलिंडर बुक करण्यासाठी अवघ्ये पाच दिवस बाकी आहेत. ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर पेटीएम (Paytm) ग्राहकांसाठी गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. पेटीएम वरून गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना ७०० रुपयांचा कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळणार आहे. ७०० रुपयांचा कॅशबॅक केवळ पहिल्या Paytm वरून गॅस बुक केल्यानंतरच मिळणार आहे. जो कोणी पहिल्यांदा सिलिंडर बुक करतो. त्यांनी पेटीएमवरून पेमेंट पे करावे लागणार आहे. त्यानंतर ऑफर आपोआप जनरेट होईल. पेटीएमने या ऑफरसाठी अनेक गॅस कंपनीसोबत पार्टनरशीप केली आहे. वाचाः या ऑफरचा फायदा Paytm Appवरून घ्यायचा असेल तर सर्वात आधी अॅप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर पेटीएमला ओपन करून Recharge and Pay Bills सेक्शनवर जा. त्यानंतर Book a Cylinder ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर भारत गॅस, एचपी गॅच, इंडेन गॅस, यापैकी एक निवडा. त्यानंतर आपला रजिस्टर मोबाइल नंबर किंवा LPG ID एन्टर करा. यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसेल. आता पेमेंट करून ऑफर वर जा. या ठिकाणी FIRSTLPG प्रोमो कोड टाका. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d3B9H8