Full Width(True/False)

नाट्यप्रेमींसाठी गुडन्यूज! कमी पैशात नाटक पाहता यावं म्हणून प्रशांत दामले यांचा अनोखा उपक्रम

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असं म्हणताना मराठी नाटकांकडे मात्र दुर्लक्ष होतं. मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी जितका उत्सुक असतो तितकाच तो मराठी नाटक पाहण्यासाठीही उत्सुक असतो. परंतु, नाटकांची न परवडणारी तिकिटं त्याला नाट्यगृहांमध्ये जाण्यापासून अडवतात. सहकुटुंब नाटकाला जाणं हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या खिशाला न परवडण्यासारखं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी चित्रपट आणि नाटकक्षेत्रातील निर्माते आणि यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. प्रशांत यांनी सहकुटुंब नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना केली आहे. त्यांनी त्यांच्या नाटकांच्या तिकिटांचे दर प्रायोगिक तत्वावर फक्त १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं, 'अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणुनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी रु ३०० आणि रु २०० होता. तो आता मी रु १०० ठेवीन.' त्यांच्या या निर्णयाचं नाट्यप्रेमींनी कौतुक केलं आहे. प्रशांत यांच्या घोषणेनुसार, त्यांच्या आणि या नाटकांची बाल्कनीची तिकिटं १०० रुपयांना उपलब्ध असतील. 'तू म्हणशील तसं' या नाटकाचा प्रयोग २६ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी आहे. तर 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. या दोन्ही प्रयोगांची बाल्कनीची तिकिटं ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार नाहीत. ती प्रेक्षकांना तिकीट खिडकीवर जाऊन घ्यावी लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास हळुहळु मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3snPtk6