Full Width(True/False)

जिओचे बेस्ट प्रीपेड प्लान; ७३० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः () आपल्या युजर्संसाठी जबरदस्त प्रीपेड प्लान्समध्ये मोठी वैधतेची लिस्ट ऑफर करते. कंपनीचे हे प्लान बेस्ट डेली डेटा , फ्री कॉलिंग आणि अनेक अतिरिक्त बेनिफिट्स सोबत येते. या प्लानमध्ये कंपनी काही बेस्ट सेलर प्लान सुद्धा ऑफर करीत आहे. यात ७३० जीबी पर्यंत डेटा सोबत अनेक जबरदस्त बेनिफिट्स दिले जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा २३९९ रुपयांचा प्लान जिओचा हा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी या प्रमाणे एकूण ७३० जीबी डेटा देत आहे. प्लानच्या सब्सक्रायबर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. रोज १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारखे जिओ अॅप्स फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ५९९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. ८४ दिवसांची वैधता या प्लानमध्ये मिळते. कंपनी या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सुविधा देत आहे. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जात आहे. प्लानचे खास वैशिष्ट्ये महणजेच यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते आहे. वाचाः जिओचा १९९ रुपयांचा प्लान कमी किंमतीत जिओचा हा एक प्लान आहे. या प्लानमध्ये कंपनी २८ दिवसांची वैधता मिळते. रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लानमध्ये युजर्सला रोज १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट मिळतो. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3le427i