नवी दिल्लीः Reliance Jio ने नुकतीच आपल्या प्रीपेड प्लान्सला कॅटेगरीत विभागले आहे. जिओने सुपरल व्हॅल्यू, बेस्टसेलर, आणि ट्रेडिंग कॅटेगरीतत प्रीपेड प्लानचा समावेश केला आहे. कंपनीकडे १९९ रुपयांच्या किंमतीत पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. जिओन १९९ रुयांच्या प्लानला बेस्ट सेलर कॅटेगरीत ठेवले आहे. जिओचा १९९ रुपयांचा प्लान्स संबंधी सविस्तर माहिती जाणून घ्या. वाचाः १९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान जिओचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटाचा फायदा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग प्रत्येक नेटवर्कवर देशात कुठेही लोकल आणि एसटीडी कॉल फ्री मिळते. याशिवाय, ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारखे अॅप्स अॅक्सेस फ्री मिळते. वाचाः १९९ रुपयांच्या जिओ पोस्टपेड प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा ऑफर केला जातो. हा डेटा संपल्यानंतर २० रुपये, प्रति जीबी या हिशोबाप्रमाणे चार्ज केले जाते. अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉल मिळते. ग्रहकांना रोज १०० जिओ एसएमएस फ्री मिळते. याशिवाय, जिओ टीव्ही जिओ सिनेमा , जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी, जिओ क्लाउड सारखे अॅप्सचे सब्सक्रिप्शन या पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी फ्री ऑफर करते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r4htYz