नवी दिल्लीः स्मार्टफोनला अखेर सेलसाठी आजपासून उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात कंपनीने OnePlus 9, Pro, OnePlus 9R, ला मार्केटमध्ये लाँच केले होते. OnePlus 9 आणि ची किंमत अनुक्रमे ४६ हजार ९९९ रुपये आणि ५९ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः OnePlus 9R ला या सीरिज मध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हटले आहे. याची किंमत ३९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत लाँच करण्यात आले आहे. याची सुरुवातीची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. याच्या १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला कार्बन ब्लॅक आणि लेक ब्लू कलर मध्ये खरेदी करता येऊ शकते. वाचाः OnePlus 9R ची लाँचिंग ऑफर्स जर युजर्स SBI क्रेडिट कार्ड वरून या फोनला खरेदी करीत असेल तर त्यांना २ हजारांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच या फोनला नो कॉस्ट ईएमआय द्वारे खरेदी करू शकता. ही ऑफर १४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत वैध आहे. या फोनला OnePlus Buds Z आणि OnePlus Band वर खरेदी केल्यास १८ टक्के आणि १९ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः या फोनला ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर सोबत आणले आहे. याचा बेस व्हेरियंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सोबत येते. तर दुसरे व्हेरियंट १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत येते. या फोनला कंपनीने पहिल्यांदा Hasselblad सोबत मिळून याचा कॅमेरा बनवला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी फीचर ४८ मेगापिक्सलचा आहे. दुसरा कॅमेरा १६ मेगापिक्सलचा, तिसरा ५ मेगापिक्सलचा आणि चौथा २ मेगापिक्सलचा आहे. याचा कॅमेरा सेन्सर Sony 586 आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500 एमएएचची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2400 आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tgl2Ne