Full Width(True/False)

भारतात 5G टेस्टिंगला टेलिकॉम डिपार्टमेंटकडून मंजुरी, जगात या शहरात ५जी नेटवर्क

नवी दिल्लीः डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर्सला 5G ट्रायल्स ला परमिशन दिली आहे. यात ज्या ऑपरेटर्संना परमिशन मिळाली आहे. त्यात भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि MTNLयाचा समावेश आहे. या टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर्सने ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर्स आणि टेक्नोलॉजी प्रोवाइडर्स म्हणजेच एरिक्शन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT सोबत पार्टनरशीप केली आहे. तर रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आपल्या ट्रायल्सला स्वतः टेक्नोलॉजीने टेस्ट करणार आहे. वाचाः टेलिकॉम डिपार्टमेंट ने स्पष्ट म्हटले की, त्यांनी चिनी वेंडर्सला ट्रायल्सपासून दूर ठेवले आहे. याचा अर्थ हुवावे या 5G ट्रायल्समध्ये सहभागी होणार नाही. ही बातमी अशावेळी आली ज्यावेळी संपूर्ण देशात 5G वरून जोरदार चर्चा सुरू आहे. रिलायन्स जिओने आधीच स्पष्ट केले आहे की, ती एक स्वदेशी ५जी नेटवर्क विकसित करणार आहे. जिओचे ५जी नेटवर्क भारतात डेव्हलप करण्यात येणार आहे. हे मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतवर फोकस करणारे असणार आहे. तर एअरटेल ने हैदराबाद मध्ये कमर्शियल नेटवर्कवर एक यशस्वी 5G टेस्टिंग केली होती. तसेच म्हटले होते की, ५ जी नेटवर्क तयार आहे. वाचाः सध्या ट्रायल्सची वेळ ६ महिन्यासाठी आहे. यात खरेदी आणि स्थापनेसाठी २ महिन्याची वेळ दिली आहे. परमिनशनमध्ये स्पष्ट म्हटले की, टेलिकॉम कंपनीला शहरी सेटिंग्स शिवाय, ग्रामीण आणि अर्थ शहरी सेटिंग्समध्ये टेस्टिंग करावे लागेल. देशात ५जी टेक्नोलॉजीचा लाभ मिळेल. टेस्टिंग स्पेक्ट्रम वेगवेगळ्या बँड मध्ये दिला जात आहे. ज्यात मिड बँड (3.2 गीगाहर्ट्ज़ ते 3.67 गीगाहर्ट्ज़), मिलीमीटर वेव बँड (24.25 गीगाहर्ट्ज़ ते 28.5 गीगाहर्ट्ज़) आणि सब-गीगाहर्ट्ज़ बँड (700 गीगाहर्ट्ज़) चा समावेश आहे. टेलिकॉम कंपन्याला या ठिकाणी 5G टेस्टिंगचे संचालन करण्यासाठी आपल्या सध्याच्या स्पेक्ट्रम (800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज आणि 2500 मेगाहर्ट्ज) चा वापर करावा लागणार आहे. वाचाः गेल्यावर्षीच्या नेटवर्क टेस्टिंग प्रोवाइडर VIAVI च्या आकडेवारीनुसार, ३४ देशातील ३७८ शहरात 5G नेटवर्क उपलब्ध होते. आता यात वाढ झाली आहे. त्यावेळी दक्षिण कोरियाच्या ८५ शहरात, चीनच्या ५७ शहरात अमेरिकेच्या ५० शहरात, यूकेच्या ३१ शहरात 5G सर्विस आधीपासून उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tn5zds