Full Width(True/False)

स्मार्टफोन आणि ईयरफोननंतर आता रियलमीचा लॅपटॉप येतोय, या किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः रियलमी लवकरच आपला नवीन लॅपटॉप घेऊन येत आहे. स्मार्टफोन कंपनीने आपल्या फोरमवर युजर्सना लॅपटॉप्सवरून अनेक प्रश्न विचारणे सुरू केले आहेत. रियलमीने ग्राहकांना विचारले आहे की, आगामी तीन महिन्यात नवीन लॅपटॉप खरेदी करण्याची प्लानिंग करीत आहात का. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पहिल्या लॅपटॉपला २०२१ च्या तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये लाँच करू शकते. वाचाः रियलमी आपल्या फोरमवर ज्या युजर्संना प्रश्न विचारीत आहे. त्यांच्याकडून खासगी माहिती, वय, जेंडर, वार्षिक मिळकतसह अन्य महत्त्वाची माहिती मिळवत आहे. यानंतर रियलमीने त्या युजर्संना हाही प्रश्न विचारला आहे की, फोनचा वापर करणारे युजर्सं या फोनवर किती खूष आहेत. कंपनी नेहमी आपल्या युजर्संसोबत असा रिव्ह्यू घेत असते. या सर्व प्रश्नानंतर कंपनीने युजर्संना लॅपटॉप विषयी प्रश्न विचारले आहे. रियमलीने लॅपटॉपवरून विचारले की, जर कंपनी लॅपटॉप लाँच करीत असेल तर त्याची किंमत किती असायला हवी. रियलमी या लॅपटॉपची किंमत ३० हजार ते ५० हजार रुपये दरम्यान लाँच करू शकते. म्हणजेच कंपनी एन्ट्री लेवल लॅपटॉप लाँच करण्याची तयारी करीत आहे. वाचाः भारतात रियलमी लॅपटॉप लाँच केल्यास याची थेट टक्कर शाओमीच्या नोटबुक १४ सोबत होईल. याची किंमत ४१ हजार ९९९ रुपये आहे. रियलमीने लोकांना हेही विचारले की, त्यांच्याकडे कोणत्या ब्रँडचा लॅपटॉप आहे. यावरून कंपनी आयडिया घेत आहे. याआधी कंपनीने एप्रिल महिन्यात लॅपटॉप लाँच वरून युजर्संसोबत एक प्रँक केला होता. पंरतु, नंतर कंपनीने सांगितले की, हे एप्रिल फुल आहे. परंतु, आता लॅपटॉप लाँचिंग संबंधी कोणताही मजाक नाही. कारण, कंपनीला आता खरोखरच लॅपटॉप लाँच करायचा आहे. कंपनीचा हा मार्केटमधील पहिला लॅपटॉप असेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ro98Tk