मुंबई- करोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. कित्येकांना करोनाची लागण झाली आहे. अनेकांचे जीव जात आहेत. आता आयपीएलमधील काही खेळाडूंना देखील करोनाची लागण झाली आहे. क्रिकेट मंडळाने खेळाडूंची काळजी घेण्याचं जाहीर केलं होतं. त्याशिवाय खेळाडूंसाठी बायो- बबलही बनवण्यात आल्याचं म्हटलं होतं. तरीही खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने मराठमोळे दिग्दर्शक यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत आयोजित करणाऱ्या क्रिकेट मंडळाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. आयपीएल मधील खेळाडूंसाठी बायो-बबल असतानाही संघातील फिरकीपटू संदीप वॉरियर आणि वरूण चक्रवर्थी यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेन्जर्स बँगलोर मधील सामना रद्द करावा लागला. याच पार्श्वभूमीवर ट्वीट करत केदार यांनी म्हटलं, 'हे कसलं बायो- बबल? एवढी खबरदारी घेतली म्हणता तरी आयपीएल २०२१ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आलेच ना? मढ्यावरचं लोणी खाणारे हे क्रिकेट मंडळ... कर्म सगळी उत्तरं चोख देणार...' असं म्हणत केदार यांनी संताप व्यक्त केला. केदार यांनी यापूर्वीही ट्विट करत आयपीएलच्या आयोजकांवर निशाणा साधला होता. 'याक्षणी बक्कळ पैसा कमावणारे म्हणजे...रणवीर सिंग आणि त्याच्या जाहीरातींमध्ये दाखवले जाणारे आयपीएलवाले.. दिल्लीच्या व अहमदाबादच्या सरणावर आयपीएल जोरात..' असं ट्विट करत केदार यांनी आक्षेप नोंदवला होता. 'गलगले निघाले', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'इरादा पक्का', 'ऑन ड्युटी २४ तास', 'खो- खो', 'श्रीमंत दामोदर पंत', 'अगं बाई अरेच्चा!', 'रंगीला रायबा' यांसारख्या चित्रपटातून केदार यांनी नवनवीन विषय मांडत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. लवकरच केदार यांचा 'बाईपण भारी देवा' हा अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, IPL चा १४वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी घेतला. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. कालच आयपीमधील दोन खेळाडूंना बायो बबलमध्ये असताना करोनाची लागण झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33aADlZ