नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर २ मे पासून Big Saving Days सेल सुरू झाला असून, या दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळत आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. आज अशाच स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया, ज्यांची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे व फीचर्स मात्र प्रीमियम फोन सारखे आहेत. वाचा :
  • या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये आहे. यावर २,५०० रुपयांच्या डिस्काउंटसह ९,४९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यावर ८,९५० रुपयांची एक्सचेंज देखील मिळते. पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोनला केवळ ५४९ रुपयांमध्ये खरेदी करणे शक्य आहे.
  • यासोबतच फोनला नो कॉस्ट ईएमआयवर देखील करता येईल. एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के सूट आणि एक्सिस क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळते.
  • फीचर्सबद्दल सांगायचे तर फोनमध्ये ६.५३ इंचचा फूल एचडी प्लस इन-सेल आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन २३४०x१०८० आहे. ग्राफिक्ससाठी यात ARM G52 MC2 जीपीयू मिळेल. हा फोन अँड्रॉइड 10 वर काम करतो. फोनमध्ये 2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी80 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत येतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये 13 मेगापिक्सल+8 मेगापिक्सल+5 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचाक्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. तर फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi 9 Power
  • या फोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. यावर ४ हजार रुपये सूट मिळत असून, याद्वारे फोन ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनवर ९,४५० रुपये एक्सचेंज ऑफर देखील आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास ५४९ रुपयात फोन खरेदी करता येईल.
  • यासोबतच फोनला नो कॉस्ट ईएमआयवर देखील करता येईल. एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के सूट आणि फ्लिपकार्ट एक्सिस क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळते.
  • फोनमध्ये ६.५३ इंचचा फूल एचडी डिस्प्ले मिळेल, ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन २३४०x१०८० आहे. ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो ६१० जीपीयू देण्यात आले आहे. हा फोन अँड्राईड १० वर काम करतो.
  • हाफोन २ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसोबत येतो.स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
Motorola E7 Power
  • या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये असून, ३००० रुपये डिस्काउंटसह फोनला ६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनवर ६,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत असून, याचा पूर्ण फायदा झाल्यास ग्राहक फोनला केवळ ५४९ रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.
  • फोनला नो कॉस्ट ईएमआयवर देखील करता येईल. एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के सूट आणि फ्लिपकार्ट एक्सिस क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळते.
  • फीचर्सबद्दल सांगायचे तर फोनमध्ये ६.५१ इंच चडी प्लस एलसीडी आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १६००x७२० आहे. फोन अँड्राईड १० वर काम करतो. फोनमध्ये 2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी25 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. तर स्टोरेज २ जीबी+३२ जीबी आहे. इंटर्नल स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येईल.
  • फोनमध्ये 13 मेगापिक्सल+2 मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा मिळेल. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय ५००० एमएएचची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
realme Narzo 30A
  • realme Narzo 30A या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये आहे. २००० रुपये डिस्काउंटसोबत फोनला ८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर देखील करता येईल. एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के सूट आणि फ्लिपकार्ट एक्सिस क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळते.
  • फीचर्सबद्दल सांगायचे तर यात६.५१ इंचचा एचडी प्लस एलसीडी इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन१६००x७२० आहे. फोन अँड्राईड १० वर काम करतो. फोन २ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबी पर्यंत वाढवता येईल.
  • फोनमध्ये १३ मेगापिक्सल+२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच फ्रंटला ८ मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी ६००० एमएएच बॅटरी दिली आहे.
OPPO A12
  • या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये आहे. ३,००० रुपये डिस्काउंटसह फोनला ७,९९० रुपयांत खरेदी करता येईल. यावर ७,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळते. फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास ग्राहक फोनला ५४० रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.
  • फोनला नो कॉस्ट ईएमआयवर देखील करता येईल. एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के सूट आणि फ्लिपकार्ट एक्सिस क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळते.
  • फोनमध्ये ६.२२ इंचचा एचडी प्लस टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन १५२०x७२० आहे. हा फोन अँड्राईड ९ वर काम करतो. फोनमध्ये १.८ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी35 प्रोसेसर मिळेल. स्टोरेजबद्दल सांगायचे तर ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबी पर्यंत वाढवता येईल.
  • फोनमध्ये १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा ड्युल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी ४३२० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3efRYQY