Full Width(True/False)

OnePlus ची ४० इंचाची स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात २४ मे रोजी लाँच होणार

नवी दिल्लीः OnePlus च्या दोन नवीन स्मार्ट टीव्ही भारतात लवकरच लाँच करण्यात येणार आहेत. OnePlus Y सीरीजची स्मार्ट टीव्ही OnePlus TV 32Y1 आणि OnePlus TV 43Y1 आधीच भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वनप्लसची या सीरीज मधील नवीन स्मार्ट टीव्ही OnePlus TV 40Y1 ला २४ मे रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. नवीन स्मार्ट टीव्ही OnePlus TV Y1 स्वस्त असणार आहे. OnePlus Y1 ची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः संभावित किंमत OnePlus च्या ट्वीट नुसार, OnePlus TV 40Y1 भारतात २४ मे रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंगनंतर टीव्हीची विक्री सुरू केली जाणार आहे. वनप्लसची ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही OnePlus 32Y1 ची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ४३ इंचाचा OnePlus TV 43Y1 स्मार्ट टीव्हीची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. त्यामुळे ४० इंचाचा OnePlus 40Y1 स्मार्ट टीव्हीची किंमत स्वस्त असण्याची शक्यता आहे. वाचाः OnePlus TV 40 Y1 टीव्हीची फीचर्स भारतात २४ मे रोजी लाँच करण्यात येणाऱ्या या टीव्हीत 64 bits प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. जो अँड्रॉयड टीव्ही ९ बेस्ड OXygenPlay वर काम करतो. याचा स्क्रीन साइज ४० इंचाचा आहे. जो फुल एचडी (1,920x1,080 पिक्सल) ला सपोर्ट करतो. यात ९३ टक्के DCI-P3 colour gamut ची कव्हरेज मिळणार सोबत Gamma Engine पिक्चर इन्वेंसरचा सपोर्ट दिला जाणार आहे. स्मार्ट टीव्हीची बेजेललेस डिझाइन आणि इंटिग्रेटेड फीचर सारखे वनप्लसचे कनेक्टचा वापर करण्यात आला आहे. OnePlus TV 40Y1 स्मार्ट टीव्हीत इन बिल्ट क्रोमकास्ट, अलेक्सा, गुगल असिस्टेंट, आणि गुगल प्ले स्टोरचा वापर करण्यात आला आहे. यात प्री अपलोड अॅप जसे Netflix, Prime Video आणि YouTube चा वापर केला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f5Ddk5