Full Width(True/False)

Oppo A53 च्या किंमतीत मोठी कपात, लवकर खरेदी करा हा स्मार्टफोन

नवी दिल्लीः जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही गोल्डन संधी आहे. १२ हजार ९९० रुपयांत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा व्हेरियंटचा फोन डिस्काउंट सोबत मिळत आहे. तर १५ हजार ४९० रुपयांत येणारा ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर सुद्धा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या या फोनसंबंधी डिटेल्स माहिती. वाचाः फोनची किंमत आणि ऑफर Oppo A53 च्या किंमतीत गेल्या वर्षी लाँच नंतर २५०० रुपयांची कपात करण्यात आली होती. ओप्पोचा हा स्मार्टफोन १० हजार ९९० रुपयात येतो. ओप्पोच्या या फोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यानंतर या फोनची किंमत १० हजार ९९० रुपये झाली आहे. तर याच्या टॉप मॉडलची ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमतीत १५० रुपयांच्या डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर या फोनची किंमत १२ हजार ९०० रुपये झाली आहे. या दोन्ही व्हेरियंटच्या किंमतीत आता कपात करण्यात आली आहे. ओप्पोच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइटवर ही कपात दिसत आहे. वाचाः फोनची खास फीचर्स Oppo A53 मध्ये ६.५० इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. त्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 460 प्रोसेसर दिला आहे. ऑपरेटिंग सिस्टममध्ये हा फोन स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. स्टोरेज म्हणून यात ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला Electric Black, Fairy White आणि Fancy Blue कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वाय फाय, जीपीएस, ब्लूटूथ व्ही ५.००, एनएफसी, यूएसबी टाइप सी, ड्युअल सिम सपोर्ट आणि ३.५ हेडफोन जॅक दिला आहे. या फोनमध्ये फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेंसर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, कंपास/मेग्नेटोमीटर सेंसर, प्रोक्सिमिटी सेंसर, एक्सेलेरोमीटर सेंसर आणि एंबिएंट लाइट सेंसर यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aVJ0pO