Full Width(True/False)

Video- ड्रेस नीट करण्यासाठी सलमानने कतरिनाला केला होता इशारा

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्री यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. त्यांची जोडी बॉलिवूडमधील आवडत्या जोडींपैकी एक आहे. सलमान आणि कतरिना यांच्यात मैत्रीचं नातं आहे. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा अजूनही बॉलिवूड वर्तुळात होत असल्या तरी सलमान आणि कतरिनाने या गोष्टींना कधीही दुजोरा दिला नाही. असं असलं तरी कतरिनासाठी सलमानच्या मनात एक वेगळी जागा आहे, हे त्याच्या वागण्यावरून प्रेक्षकांच्या ध्यानात येतं. सलमान नेहमी मित्राच्या नात्याने कतरिनाची काळजी घेताना दिसतो. एका कार्यक्रमात सलमानने कतरिनाला 'उप्स मोमेन्ट'ची बळी पडण्यापासून वाचवलं होतं. सलमान आणि कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात सलमान कतरिनाला तिचा ड्रेस ठीक करण्यासाठी इशारा करत आहे. हा व्हिडीओ २०१७ च्या आयफा पुरस्कारांच्या प्रेस मीटचा आहे. या पुरस्कार सोहळ्यात कतरिनाने डिप नेकचा ड्रेस घातला होता. पूर्ण कार्यक्रमादरम्यान सलमान फक्त कतरिनाकडेच पाहत होता. थोड्या वेळाने जेव्हा त्या ड्रेसचा गळा आणखीनच खाली गेला तेव्हा सलमानला राहवलं नाही आणि त्याने कतरिनाला ड्रेसचा गळा नीट करण्याचा इशारा केला. सलमानचा इशारा पाहून कतरिना सुरुवातीला थोडीशी गोंधळली परंतु, थोड्या वेळातच कतरिना हसत हसत मागे वळली आणि तिने ड्रेस नीट केला. पुन्हा एकदा सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा सलमानच्या चांगुलपणाचे चाहते झाले आहेत. ते सलमानचं कौतुक करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान कतरिना, सलमान यांच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट देखील उपस्थित होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f1pCZO