Full Width(True/False)

न्यू प्रायव्हसी पॉलिसी : WhatsAppकडून १५ मेच्या डेडलाईनबद्दल मोठी घोषणा

नवी दिल्ली. कित्येकांचा दिवस WhatsApp शिवाय सुरु होत नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मित्र- मंडळींसोबत चॅट असो किंवा ऑफिस ग्रुप्स वर महत्वाचे संभाषण, व्हाट्स अँप महत्वाचे बनले आहे. परंतु, अशात व्हाट्स अँपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा धक्का सर्वांना दिला आणि सगळेच काळजीत पडले. १५ मे पर्यंत अटी न स्वीकारल्यास अकाउंट बंद करण्यात येईल असा इशारा देखील कंपनीतर्फे देण्यात आला होता . अकांऊट बंद होईल या भीतीने अनेक युझर्सने अटी मान्य करत अकाउंट पुढे सुरु ठेवण्याचे ठरविले. तर दुसरीकडे अनेकांनी अद्याप ही नवीन प्रायव्हसी पॉलीसी स्विकारलेली नाही. कंपनीच्या या अटींमुळे कत्येक युसर्सने सिग्नल आणि टेलिग्रामची वाट धरली होती. परंतु, आता कंपनीने यावर यु- टर्न घेतला असून अटी मान्य करा अथवा करू नका याचा पूर्ण अधिकार युझर्सना दिला असून १५ मे नंतर कुणाचेही अकाऊंट डिलीट करण्यात येणार नाही असे नेक्स्ट वेबने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. वाचा : WhatsApp ने त्यांच्या विधानात म्हटले कि, अनेक युझर्सनी नवीन अटी मान्य केल्या असून काहींना अद्याप असे करता आले नाही आहे. ज्यांनी असे केले नाही त्यांचे अकाउंट डिलीट करण्यात येणार नाही. १५ मे नंतर देखील ते सुरळीत सुरु राहील. असे कंपनीच्या एफएक्यू पेज वर सांगण्यात आले आहे. कंपनीच्या या नवीन कंपनीच्या या वादग्रस्त अपडेटमुळे अनेकांनी सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया अँप डाउनलोड करणे पसंत केले जे व्हाट्स अँप चे रायवल अँप्स आहेत. परंतु, आता अकाउंट डिलीट होणार नसल्यामुळे आधी ज्यांनी अटी खाजगी मान्य केल्या नाहीत त्यांना टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tsgRNO