नवी दिल्ली : ने भारतात आणि हे दोन बजेट लाँच केले आहेत. फोन्समध्ये ६.९५ इंच फुलएचडी+ डिस्प्ले, १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सारखे फीचर्स मिळतeत. प्रो व्हेरिएंटमध्ये ९० हर्ट्स रिफ्रेश रेट पॅनेल मिळतो. या दोन्ही हँडसेटच्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया. वाचाः किंमत आणि उपलब्धता स्मार्टफोन ७ डिग्री पर्पल, ९५ डिग्री ब्लॅक आणि ऐमरेल्ड ग्रीन रंगात येतो. याच्या ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. नोट १० प्रोच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १६,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा फोन ७ डिग्री पर्पल, ९५ डिग्री ब्लॅक आणि नॉर्डिक सीक्रेट रंगात येतो. दोन्ही फोन्सला १३ जूनपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. Infinix Note 10: स्पेसिफिकेशन्स इनफिनिक्स नोट 10 मध्ये ६.९५ इंच (२४६०x१०८०) फुलएचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G८५ प्रोसेसर देण्यात आला आहे, जो १२एनएम फॅब्रिकेशनवर आधारित आहे. यात ग्राफिक्ससाठी माली-G५२ जीपीयू मिळेल. फोनला ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवता येईल. इनफिनिक्स नोट 10 ड्यूल सिम सपॉर्ट करतो. फोन अँड्राइड ११ वर आधारित XOS ७.६ वर चालतो. पॉवरसाठी यात १८ वॉट एक्स-चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ५००० mAh बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५, जीपीएस, ग्लोनास, यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स मिळतील. फोनमध्ये साइडला फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासोबत २ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल पोट्रेट सेंसर मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनचे डायमेंशन १७३.२×७८.८×८.८ मिलीमीटर आहे. वाचाः Infinix Note 10 Pro: स्पेसिफिकेशन्स मध्ये ६.९५ इंच (२४६०x१०८०) फुलएचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज, टच सँपलिंग रेट १८० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G९५ प्रोसेसर मिळेल. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २ टीबीपर्यंत वाढवता येईल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात क्वाड एलईडी फ्लॅशसोबत ५४ मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सल १२० डिग्री अल्ट्रा-वाइड अँगल, २ मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाइट आणि २ मेगापिक्सल पोट्रेट कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ड्यूल सिम सपोर्ट इनफिनिक्स नोट 10 प्रो अँड्राइड ११ वर आधारित XOS७.६ वर चालतो. फोनला बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३.५ एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, सिनेमॅटिक ड्यूल स्पीकर्स सारखे फीचर्स मिळतात. या व्यतिरिक्त ड्यूल ४G VoLTE, वाय-फाय८०२.११ एसी, ब्लूटूथ ५, जीपीएस, ग्लोनास, यूएसबी टाइप-सी सपोर्ट देखील आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगसोबत येते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z8EWNx