Full Width(True/False)

मस्तच! रोजच्या ८ रुपये खर्चात रोज 4GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः भारतात करोना संकटात लोकांना इंटरनेटची गरज जास्त लागत आहे. सध्या लोकांना इंटरनेट आणि डेटा सर्वात महत्त्वपूर्ण झाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास प्लानबद्दल माहिती देत आहोत. ज्यात फक्त ८ रुपये खर्चात ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सह मेसेजची सुविधा मिळते. वाचाः बेस्ट डेटा प्लान वोडाफोन आयडियाने करोना संकटात लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी ३ जबरदस्त प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. या प्लानची किंमत २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्संना डेली २ जीबी डेटा सोबत एक्स्ट्रा २ जीबी डेटा मिळतो. वोडाफोन आयडियाच्या या तीन प्लानमध्ये ४४९ रुपयांचा प्लान सर्वात जास्त चांगला आहे. याची वैधता ५६ दिवसांची आहे. जर तुम्ही ४४९ रुपयांना भागीले तर रोजचा खर्च फक्त ८ रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त ८ रुपयांत ४जीबी डेटा, रोज १०० मेसेज आणि अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक सुविधेचा लाभ मिळतो. वाचाः अनेक फायदे वोडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला MPL खेळण्यासाठी १२५ रुपये बोनस, झोमॅटो वर ७५ रुपयांचा डिस्काउंट बोनस आणि Vi Movies & TV चे अॅक्सेस मिळते. यासोबतच युजर्संना My11Circle च्या विकली कॉन्टेस्टवर ५० टक्के लाभ मिळतो. वोडाफोन आयडियाच्या या प्लानसोबत २९९ रुपये आणि ६९९ रुपयांचा प्लान सुद्धा आहे. ज्यात युजर्संना २८ दिवस आणि ८४ दिवसाची वैधता मिळते. बाकी या दोन्ही प्लानमध्ये युजर्संना डेली ४ जीबी डेटा सह अन्य सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SZp5Ab