मुंबई: मागच्या काही दिवसांपासून '' या वेब सीरिजचीच चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजमध्ये प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. दुसऱ्या सीझनलाही अपेक्षेप्रमाणेच प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. पण असं असतानाही या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली भूमिका म्हणजे '' वेब सीरिजच्या नायकाला वेळोवेळी मदत करणाऱ्या चेल्लम सरांची भूमिका अभिनेता यांनी साकारली आहे. पण या भूमिकेसाठी त्यांची निवड कशी झाली याचा अनुभव त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेअर केला. 'द फॅमिली मॅन २'मध्ये चेल्लम सर ही भूमिका सारणारे अभिनेता उदय महेश यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या या भूमिकेविषयी सांगितलं. ते म्हणाले, 'या वेब सीरिजमध्ये मी जी भूमिका साकारली ती माझ्यासाठी खूप खास आहे.' या आधी 'ऑफिस' नावाच्या एका तमिळ टीव्ही मालिकेत त्यांनी विश्वनाथन ही भूमिका साकारली होती ज्यामुळे घराघरात लोक त्यांना ओळखू लागले होते. पण चेल्लम सरांच्या भूमिकेनं त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली. उदय महेश यांनी यापूर्वी जॉन अब्राहमच्या 'मद्रास कॅफे' या चित्रपटात एका लहानशी भूमिका साकारली होती. पण या वेब सीरिजसाठी त्यांची निवड होण्याचा किस्सा खास आहे. त्यांनी खरं तर या वेब सीरिजमधील दिपेन या व्यक्तीरेखेसाठी ऑडिशन दिलं होतं. पण त्यांना ती भूमिका मिळाली नाही. पण काही महिन्यांनंतर त्यांना वेब सीरिजच्या टीमकडून एक कॉल आला आणि चेल्लम सर या भूमिकेसाठी विचारणा झाली. 'द फॅमिली मॅन'चा पहिला सीझन सुपरहीट ठरला होता. त्यामुळे उदय महेश यांनी 'द फॅमिली मॅन २'मधील चेल्लम सर या भूमिकेसाठी होकार दिला. पण त्यावेळी त्यांना हिच भूमिका एवढी लोकप्रिय होईल याची जराही कल्पना नव्हती. उदय महेश सांगितात, 'जर निर्मात्यानं प्रेक्षकांना काय आवडतं याची भविष्यवाणी करू शकला तर प्रत्येक चित्रपट हिट होऊ शकतो पण हे शक्य नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो आणि स्वतःच्या कामावर विश्वास ठेऊ शकतो. बाकी अखेर सर्व गोष्टी प्रेक्षकांवर अवलंबून असतात.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wkzllj