मुंबई: अभिनेत्री आणि 'बिग बॉस १४'ची स्पर्धक निक्की तांबोळीच्या भावाचं महिन्याभरापूर्वीच करोनाव्हायरसमुळे निधन झालं. निक्कीसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. पण असं असतानाही केवळ भावाची शेवटची इच्छा म्हणून निक्कीनं ' ११'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सध्या ती या शोचं केपटाऊनमध्ये शूटिंग करत आहे. पण आपल्या भावाला गमावल्याचं दुःख आजही आहे. भावाच्या निधनानंतर सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून आपलं दुःख व्यक्त करणाऱ्या निक्कीनं आपल्या आई- वडिलांशी मात्र बोलणं बंद केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्की तांबोळीनं भावाच्या निधनानंतर तिला कोणत्या परिस्थितीला समोर जावं लागलं हे सांगितलं. 'हे दुःख मी आई- बाबांसोबत शेअर करू शकत नाही किंवा त्यांच्यासमोर रडू शकत नाही. माझं दुःख मी कोणाला सांगू किंवा शेअर करू असं कोणी मला सापडलंच नाही.' असं यावेळी या मुलाखतीत निक्कीनं सांगितलं. म्हणाली, 'खरं सांगू तर मला असं कोणीच सापडलं नाही ज्याच्या समोर बसून मी बोलू शकेन, माझं दुःख सांगू शकेन. मी माझ्या आई- बाबांशी बोलणंच सोडलं आहे. मी केपटाऊनमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या समोर बसून बोलू शकत नाही किंवा रडूही शकत नाही. कारण मला माहीत नाही त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल किंवा ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत.' निक्की पुढे म्हणाली, 'माझ्या भावासोबत काय झालं हे मी माझ्या आई- बाबांना नाही सांगू शकत. कारण ते त्याचेही पालक आहेत. त्यांनी आपला मुलगा गमावला आहे. जर मी त्यांच्या समोर कमजोर पडले तर मग त्यांची काय अवस्था होईल. त्यामुळे मी या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.' करोनामुळे ४ मे रोजी निक्की तांबोळीच्या भावाचं निधन झालं होतं. त्याआधी काही काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भावाच्या निधनानंतर निक्कीनं इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं भावाचं निधन नेमकं कशामुळे झालं हे स्पष्ट केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cASs2Q