Full Width(True/False)

मराठी बिग बॉसची उत्सुकता; 'या' दोन नावांची जोरात चर्चा

मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमुळे शोच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२० साली करोनामुळे 'बिग बॉस मराठी'चा तिसरा सीझन लांबणीवर गेला होता. परंतु हाच तिसरा सीझन जुलै महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सूत्रांकडून कळलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत हे निश्चित झालं असलं तरी स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात कोणते नवे चेहरे दिसतील हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. मुंटाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहा जोशी आणि संग्राम समेळ ही दोन नावं पुढे आली आहेत. चॅनलच्या टीमकडून संग्रामला शोमध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खरंच हे दोन्ही कलाकार बिग बॉस मराठीच्या घरात दिसतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचसोबत संग्रामची पहिली पत्नी अभिनेत्री पल्लवी पाटील हीदेखील या नव्या सीझनमध्ये स्पर्धक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच यंदाच्या सीझनसाठी इंडस्ट्री बाहेरील चेहऱ्यांनादेखील विचारणा करण्यात आल्याचं समजलं आहे. त्यातील काही नावं अमराठी असण्याची शक्यता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vPctcW