Full Width(True/False)

स्मार्टफोनमधील हे ८ धोकादायक अॅप्स तात्काळ डिलीट करा, पाहा कोणकोणते अॅप्स आहेत

नवी दिल्लीः जर तुम्ही अँड्ऱॉयड स्मार्टफोनचा वापर करीत असाल तर तुम्हाला अलर्ट राहावे लागणार आहे. कारण, Google Play Store वर नुकत्याच ८ अॅप्सची ओळख पटली आहे. ज्यात जोकर मालवेयर मिळाले आहेत. या अॅप्सला Quick Heal Security labs ने स्पॉट केले आहे. SamMobile रिपोर्टच्या माहितीनुसार, हे ८ अॅप्स अँड्रॉयड स्मार्टफोन युजरचा डेटा चोरी करू शकतात. ज्यात बँकिंग फ्रॉड सारख्या घटना घडू शकतात. वाचाः Google ने या धोकादायक अॅप्सला Google Play Store वरून हटवले आहे. Google Play Store वर आता हे डाउनलोडसाठी उपलब्ध नाहीत. परंतु, जर तुम्ही हे अॅप्स आधीच डाउनलोड केले असतील तर ते तात्काळ मोबाइलमधून डिलीट करा. हे अँड्रॉयड अॅप्स विना परवानगी महागड्या सब्सक्रिप्शनला साइन अप करु शकतात. तसेच मेलवेयर फोन कॉन्टॅक्ट लिस्ट, डिव्हाइस इन्फॉर्मेशन, मेसेज सारखी महत्त्वाची माहिती चोरी करू शकतात. वाचाः धोकादायक अॅप्सची यादी पाहा १. Auxiliary Message २. Fast Magic SMS ३. Free CamScanner ४. Super Message ५. Element Scanner ६. Go Messages ७. Travel Wallpapers ८. Super SMS वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h2DJ1V