नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने काही दिवसांपूर्वी लवकरच फीचर आणणार असल्याची घोषणा केली होती. या फीचर अंतर्गत यूजर्स आपल्या फॉलोअर्सकडून अतिरिक्त कॉन्टेंटसाठी शुल्क आकारू शकतील. या फीचरचा सर्वाधिक फायदा सेलिब्रेटीज, लेखक किंवा पत्रकार सारख्या यूजर्सला होईल. रिव्हर्स इंजिनिअर Jane Manchun Wong ने काही स्क्रिनशॉट पोस्ट केले असून, यात हे फीचर कसे काम करते याची माहिती मिळते. वाचाः या यूजर्ससाठी असेल नवीन फीचर रिपोर्टनुसार, सुपर फॉलोअर्स प्रोग्राम केवळ अशा यूजर्ससाठी असेल ज्यांचे कमीत कमी १० हजार फॉलोअर्स आहे. याशिवाय मागील ३० दिवसात किमान २५ ट्विट पोस्ट केलेले असणे आवश्यक आहे व वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. ट्विटरने आधीच सांगितले की सुपर फॉलोअर्सचे प्रामयरी फीचर बोनस कॉन्टेंट असेल. म्हणजे, एखादे एक्सक्लूसिव्ह ट्विट वैगेरेचा यात समावेश असेल. वॉन्गने कॉन्टेंटची एक लिस्ट देखील शेअर केली आहे, ज्यात यूजर्स आपल्या आवडीची कॅटेगरी निवडू शकतात. सुपर फॉलो एक प्रकारे स्बस्क्रिप्शन आधारित मेंबरशीप असेल. यात एक सुपर फॉलो यूजरकडून महिन्याला ४.९९ डॉलर (जवळपास ३६३ रुपये) शुल्क घेतले जाईल. थोडक्यात, अतिरिक्त व खास पोस्ट पाहण्यासाठी फॉलोअर्सला पैसे द्यावे लागतील. वाचाः ट्विटरने यावर्षी प्लॅटफॉर्मवर काही डायरेक्ट पेमेंट फीचर देखील आणले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच सांगितले की नावाच्या एका फीचरचे टेस्टिंग केले जात आहे. या अंतर्गत यूजर्सला प्रोफाइलवर देण्यात आलेल्या डॉलर बिल आयकॉनवर क्लिक करून थेट ट्विटर क्रिएटर्सला पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. टिप जार पेमेंटमध्ये कंपनी कोणतेही कमिशन घेत नसल्याचे देखील ट्विटरने म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SgDaJx