नवी दिल्ली : सध्या करोना व्हायरस महामारीमुळे शाळा, महाविद्यालय देखील ऑनलाइनच सुरू आहे. अशा स्थितीमध्ये लॅपटॉपची आवश्यकता भासते. जर तुमचा जुना खराब झाला असेल व तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम लॅपटॉप शोधत असाल तर ऑनलाइन अनेक पर्याय उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या लॅपटॉप्सबद्दल माहिती देत आहोत, ज्यात दमदार फीचर्स मिळतात. या बजेटमध्ये इंटरनेट ब्राउजिंग, व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग आणि इतर बेसिक कामासाठी चांगले लॅपटॉप मिळतात. वाचाः M515DA Windows 10 laptop या Asus Vivobook चा मॉडेल नंबर M515DA-EJ001T आहे आणि हा लॅपटॉप AMD Athlon Silver ३५० U प्रोसेसर, १ टीबी एचडीडी स्टोरेज, ४ जीबी DDR४ रॅम, AMD Radeon इंटिग्रेटेड ग्राफिक्स, १५.६ इंच फूलएचडी डिस्प्ले आणि विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. या लॅपटॉपची किंमत २७,९९० रुपये आहे. या मध्ये ४ जीबी रॅम, १ टीबी एचडीडी स्टोरेज, १४ इंच डिस्प्ले, AMD Radeon इंटिग्रेटेड ग्राफिक्स, AMD A६ प्रोसेसर आणि ६४ बिट विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. या लॅपटॉपला ग्राहक २२,९९० रुपयात खरेदी करू शकतात. 14a-na0002TU laptop हा HP Laptop इंटेल Celeron N४०२० प्रोसेसर, ६४ जीबी एसएसडी स्टोरेज, गूगल क्रोमओएस, ४ जीबी रॅम, १४ इंच डिस्प्ले आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्ससोबत येतो. लॅपटॉपची किंमत २५,९९० रुपये आहे. Acer Aspire 3 Windows 10 laptop या Acer Laptop मध्ये ग्राहकांना ४ जीबी रॅम, १ टीबी स्टोरेज, AMD Ryzen ३ प्रोसेसर, विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टम आणि १५.६ इंच स्क्रीन मिळेल. लॅपटॉपची भारतात किंमत २९,६९० रुपये आहे. वाचाः HP 15s Windows 10 laptop कमी बजेटमध्ये एचबी ब्रँडचा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर हा उत्तम पर्याय आहे. या मॉडेलमध्ये ४ जीबी रॅम, विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टम, १ टीबी एचडीडी स्टोरेज आणि Intel Celeron N४०२० प्रोसेसर मिळेल. या लॅपटॉपची किंमत २६,९९० रुपये आहे. ASUS VivoBook 14 (2020) Windows 10 laptop या लॅपटॉपमध्ये १४ इंच फूल एचडी स्क्रीन, विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम, Intel Quad Core Pentium Silver N५०३० प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १ टीबी एचडीडी स्टोरेज आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्स मिळेल. याची किंमत २४,९९० रुपये आहे. Lenovo Ideapad S145 Windows 10 laptop ३० हजार रुपये कमी बजेटमध्ये येणाऱ्या Lenovo Laptop मॉडेलमध्ये १५.६ इंच फुल एचडी स्क्रीन मिळेल. सोबतच १ टीबी स्टोरेज, ४ जीबी रॅम, AMD RYZEN ३ ३२००U प्रोसेसर आणि हा लॅपटॉप मॉडेल विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या लॅपटॉपला २८,९९० रुपयात खरेदी करता येईल. HP 14 (2021) Windows laptop या यादीतील इतर सर्व मॉडेल्स ४ जीबी रॅमसोबत येतात. मात्र, एचपी ब्रँडच्या या लॅपटॉप मॉडेलमध्ये तुम्हाला ८ जीबी रॅम, २५६ जीबी एसएसडी स्टोरेज, Intel Celeron N४५०० प्रोसेसर, विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम आमि १४ इंच एचडी स्क्रिन मिळेल. या लॅपटॉपला २९,९९० रुपयात खरेदी करता येईल. नोंद – हे सर्व लॅपटॉप्स अ‍ॅमेझॉनवर या किंमतीत सध्या उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही या लॅपटॉप्सला काही दिवसांनी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर किंमतीत बदल होऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2S8bwi8