नवी दिल्ली : देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असून, ग्राहकांपर्यंत ४जी सेवा पोहचवण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. जिओने याच वर्षी ४जी फीचर फोन यूजर्ससाठी JioPhone २०२१ ऑफर आणली होती. कंपनीनुसार, फोन सबस्क्राइबर्ससाठी खास लाँच करण्यात आलेल्या या ऑफरमध्ये १४९९ रुपये आणि १,९९९ रुपयांच्या प्लान मिळतात. ही ऑफर काय आहे जाणून घेऊया. वाचाः १,४९९ रुपयांचा प्लान १,४९९ रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना एक वर्षासाठी अनलिमिटेड सर्व्हिसेज देते. यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग, दर महिन्याला २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. म्हणजेच ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा मिळेल. हा प्लान नवीन जिओफोन यूजर्ससाठी असून, याची वैधता १ वर्ष आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना जिओफोन देखील देत आहे. यात यूजर्सला जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. विशेष म्हणजे जिओफोनमध्ये यूजर्सला , आणि सारखे अ‍ॅप्स देखील वापरता येतील. वाचाः या व्यतिरिक्त कंपनी १,९९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगसोबत २ वर्षांसाठी मोफत सर्व्हिसेज मिळतात. जर तुम्ही आधीपासूनच जिओफोन ग्राहक असाल तर ७४९ रुपयात वर्षभरासाठी अनलिमिटेड सेवा मिळेल. JioPhone: फीचर्स जिओफोन कॉम्पॅक्ट डिझाइनसोबत येतो. फोनमध्ये २.४ इंच QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १५०० एमएएचची बॅटरी मिळेल, जी ९ तास बॅटरी लाइफसह येते. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये एक नेव्हिगेशन पॅनेल आहे. या व्यतिरिक्त हेडफोन जॅक, मायक्रोफोन आणि स्पीकर्स देखील आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ghbqxD