मुंबई : व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा मोठा फटका चित्रपट आणि टीव्ही क्षेत्राला बसला. बर्‍याच सेलिब्रिटींना या काळात करोनाची लागण झाली. यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. आता बातमी येत आहे की '' आणि बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभ हिचे करोनामुळे निधन झाले. रिंकूचा चुलत बहीण चंदासिंह निकुंभा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रिंकूची चुलत बहिण चंदा सिंह निकुंभने सांगितले, 'रिंकूला २५ मे रोजी करोना झाल्याचे समजले. त्यानंतर ती घरातच क्वारन्टाइन होती. परंतु तिचा ताप कमी होत नसल्याने आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. परंतु तिची प्रकृती पाहता तिला आयसीयूमध्ये दाखल न करता डॉक्टरांनी तिच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू केले. तिची तब्येत अधिक बिघडल्यानंतर तिला आयसीयूमध्ये नेण्यात आले. तिथे दाखल केल्यानंतर तिची प्रकृती हळूहळू सुधारत होती. परंतु ती मनाने खचत चालली होती. या आजारातून आपण बरे होणार नाही, हाच विचार सतत तिच्या मनात होता. त्यातच तिला दम्याचाही आजार होता.' चंदाने पुढे सांगितले, 'रिंकूचा स्वभाव अतिशय मनमोकळा होता. तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा होती. हॉस्पिलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असतानाही ती लोकांना जमेल तशी मदत करत होती. खरे तर तिला एका चित्रीकरणासाठी गोव्याला जायचे होते. परंतु करोनामुळे तिला जाऊ नको असे आम्ही सांगितले. परंतू घरात राहूनच तिला करोना झाला. तिच्या घरामधील इतर सदस्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.' दरम्यान, रिंकूने ७ मे रोजी करोनाचा पहिला डोस घेतला होता अशी माहिती तिच्या बहिणीने दिली. रिंकूने 'चिडीयाघर' आणि 'बालवीर' सारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. अखेर तिला अॅमेझॉन प्राइमच्या 'हॅलो चार्ली' या वेब सीरीजमध्ये पाहण्यात आले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g1NbCc