वृत्तसंस्था, लंडन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील ‘फास्टली’ या क्लाउड सेवा पुरवठा कंपनीची सेवा विस्कळित झाल्याने अमेरिका आणि युरोपातील अनेक महत्त्वाच्या साइट सुमारे तासभर बंद पडल्या. आशियात सिंगापूर आणि हाँगकाँगमधील काही साइटनाही या व्यत्ययाचा फटका बसला. तासाभराने साइट पूर्ववत झाल्या. वाचाः अनेक साइटवर ‘एरर ५०३’ असे संदेश झळकले. ब्रिटन सरकारची अधिकृत साइटही बंद पडली. ‘फास्टली’ कपंनीने वेबसाइटवर सेवेत खंड पडल्याची माहिती भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास दिली. ‘आम्ही समस्या शोधत आहोत,’ असा संदेश या साइटवर होता. त्यानंतर सुमारे तासाभराने समस्या सोडविण्यात यश आल्याचे कंपनीने वेबसाइटवर जाहीर केले. ‘आम्हाला समस्या सोडविण्यात यश आले आहे. काही वेळ बंद पडलेल्या साइट आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. कदाचित तेथील ट्रॅफिक एकदम वाढू शकते,’ असे या संदेशात म्हटले होते. वाचाः अमेरिकी वेळेनुसार मध्यरात्री हा प्रकार घडला होता. कंपनीने सुमारे तासाभरात समस्या दूर केली, असे इंटरनेटवरील वापराचे मूल्यमापन करणाऱ्या ‘केन्टिक’ कंपनीतील तज्ज्ञांनी म्हटले आहे. ‘फास्टली ही जगातील सर्वाधिक मोठ्या नेटवर्क कंपन्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेत खंड पडल्याचा फटका जगभरात बसला,’ अशी माहिती कंपनीतील इंटरनेटविषयक पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ डग मडोरी यांनी दिली. ‘फास्टली’ नेमके काय करते? - फास्टली हे कंटेन्ट डिलिव्हरी करणारे नेटवर्क आहे - ही कंपनी अनेक लोकप्रिय साइटना बॅक एंडला क्लाउड कम्प्युटिंग सेवा पुरवते - त्यांच्या सर्व्हरवर फोटो, व्हिडिओ, कॅशे अशी माहिती सेव्ह होते - यामुळ यूजर संबंधित साइटवरील मजकूर २०० ते ५०० मिलिसेकंद लवकर पाहता येतो, असा फास्टलीचा दावा डग मडोर इंटरनेटविषयक पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ, केन्टिक फटका का बसला? - क्लाउड सेवा पुरविणाऱ्या ‘फास्टली’ या अमेरिकी कंपनीची सेवा खंडित झाली केव्हा बसला? - भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास (स्रोत - टाइम्स ऑफ इंडिया) कोणत्या प्रमुख साइटना बसला? - न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, अॅमेझॉनच्या काही साइट, ट्वीच, रेडइट, द गार्डियन, ब्रिटन सरकारची अधिकृत साइट, फायनान्शियल टाइम्स किती वेळ बसला? - सुमारे तासभर वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v3VByz