वृत्तसंस्था, लंडन सोशल मीडियातील अग्रेसर कंपनी फेसबुकच्या मक्तेदारीविरोधात ब्रिटन सरकार व युरोपीय महासंघाने एकाचवेळी आघाडी उघडली आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांविरोधात क्लासिफाइड जाहिरात क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा करताना फेसबुककडून वापरकर्त्यांच्या डेटाचा दुरुपयोग केला जातो का, याचा तपास केला जाणार आहे, अशी माहिती युरोपीय महासंघ व ब्रिटिश नियामकांनी शुक्रवारी दिली. वाचाः ऑनलाइन क्लासिफाइड जाहिरातींच्या क्षेत्रात व बाजारपेठेत फेसबुकने ज्याप्रकारे भक्कम स्थान व मक्तेदारी निर्माण केली आहे त्यामुळे त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे जाते का व यातून स्पर्धाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे का, याचा तपास केला जाणार आहे, अशी माहिती युरोपीय आयोगाच्या कार्यकारी उपाध्यक्षा मार्ग्रेथ वेस्टेजर यांनी दिली. वाचाः फेसबुककडून वापरकर्त्यांचा डेटा संग्रहित केला जातो, तसेच संभाव्य ग्राहक मिळविण्यासाठी त्याचा वापरही केला जातो. वापरकर्त्यांच्या डेटाचा क्लासिफाइड जाहिराती व डेटिंग सेवांमधील व्यावसायिक स्पर्धेत फेसबुकला अनुचित लाभ होतो का, याची आम्ही स्वतंत्र चौकशीद्वारे तपासणी करणार आहोत, असे ब्रिटनतर्फे सांगण्यात आले. फेसबुकची मखलाशी हे आरोप कशाप्रकारे तथ्यहीन आहेत हे दाखवून देण्यासाठी आम्ही या तपासांना पूर्ण सहकार्य करू. आमच्या डेटिंग वा अन्य सेवांमुळे ग्राहकांना व्यापक प्रमाणात निवडीचे अधिकार मिळतात व त्या सेवा आम्ही कमालीच्या स्पर्धात्मक वातावरणात देत आहोत, अशी प्रतिक्रिया फेसबुकने दिली. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cgiUOX